Beauty Tips : कच्चे दूध सौंदर्य वाढविण्यासाठी फायदेशीर!

मुंबई, प्रत्येक महिलेसाठी सौंदर्य खूप महत्वाचे असते, त्यासाठी ती अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या प्रसाधनांचा वापर करते. परंतु तुम्हाला हे माहित आहे का की, कच्चा दूधाने देखील आपण आपले सौंदर्य वाढवू शकतो. दुधामध्ये भरपूर प्रमाणात पौष्टिक गुणधर्म आढळतात. जे शरीराला मजबूती देण्याबरोबरच सौंदर्य वाढविण्यासाठी देखील फायदेशीर आहे. पूर्वीच्या काळी महिला दूधाने स्नान करायच्या त्यामुळे डाग-सुरकुत्या यासारख्या समस्या दूर होत असत. चला तर मग जाणून घेऊयात कच्चे दूध लावण्याचे फायदे…

कच्च्या दूधाचा वापर (Beauty tips with raw milk)

Tan-removes

रात्री झोपण्यापूर्वी कच्चा दूधाने चेहऱ्याला मॉलिश करावे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी चेहरा साध्या पाण्याने स्वच्छ धुवावा. यामुळे चेहऱ्यावर चमक येते. चेहऱ्यावर साठलेली धूळ माती त्वचेला खराब करते परंतु चेहऱ्याची सुंदरता वाढविण्यासाठी तुम्ही दूधाचा वापर करू शकता. दूधामध्ये लॅक्टिक ऍसिड असते, जे चेहऱ्यावर साठलेली धूळ माती स्वच्छ करते. यासोबतच चेहऱ्यावरील डाग देखील निघून जातात. दूधाचा वापर फेसपॅक बनविण्यासाठी देखील करू शकता यासाठी मधात कच्चे दूध मिसळून चेहऱ्यावर मॉलिश करा.

तरूण त्वचेसाठी करा ‘हे’ घरगुती उपाय! – 

अक्रोड फेसपॅक लावल्याने त्वचा बनते चमकदार – 

दूधाचा ब्लीच म्हणून देखील वापर केला जाऊ शकतो. यामुळे चेहऱ्याला कोणतेही नुकसान होणार नाही. यासाठी कच्चा दूधात मध आणि लिंबू मिसळा त्यानंतर हे चेहऱ्यावर लावून काही वेळ तसेच ठेवा आणि त्यानंतर चेहरा स्वच्छ धुवा.

टॅन रिमूव्ह (Tan removes)

Beauty-tips-with-raw-milk

सूर्यकिरणांमध्ये अधिक वेळ राहिल्यास त्वच्या सावळी(गडद) होते. तो सावळेपणा दूर करण्यासाठी तुम्ही कच्चा दूधाचा वापर करू शकता. यासाठी ५-६ बदाम आणि ५-६ खजूर एक तास कच्चा दूधात भिजत ठेवावे. त्यानंतर त्याची पेस्ट करावी आणि ती पेस्ट चेहऱ्यावर २० मिनिटांपर्यंत लावून ठेवावी १५ मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवावा.

केसांना मऊ बनवा (Make hair soft)

कच्चे दूध केसांना देखील तुम्ही लावू शकता, यामुळे केस मऊ होतात.
A lot of nutrients are found in milk. Which along with strengthening the body, also improve the beauty.


चेहऱ्याची आणि केसांची सुंदरता वाढविण्यासाठी चीकू मास्क फायदेशीर! –

Beauty Tips : त्वचा आणि केसांसाठी वापरा चीकू मास्क!

Social Media