Beauty Tips : त्वचेला तरूण आणि उजळ ठेवण्यासाठी रेड वाइन फायदेशीर!

दीर्घकाळ काम करून थकल्यानंतर एक ग्लास वाइन पिण्यासाठी कोणीच नकार देऊ शकत नाही. सर्वांना माहित आहे की वाइन पिण्याने तणाव दूर होतो. याशिवाय त्वचेसाठी देखील वाइन खूप फायदेशीर आहे. वाइन त्वचेला तरूण ठेवण्यास मदत करते. सोबतच त्वचेवर चमक देखील आणते. रेड वाइन(Red Wine) द्राक्षांपासून बनविली जाते ज्यामध्ये रेवरट्रोल एँटीऑक्सीडेंट आढळते, जे त्वचेमध्ये वृद्धत्वाची समस्या रोखण्याचे कार्य करते.

तुम्ही रेड वाइनमध्ये(Red Wine) कोरफड (alovera), मुल्तानी माती मिसळून चेहऱ्याला लावू शकता. हे त्वचेवर क्लींझर म्हणून कार्य करेल. रेड वाइनचे अनेक फायदे आहेत. चला तर मग जाणून घेऊयात रेड वाइनच्या वापराने त्वचेला काय फायदा होतो…

वृद्धत्व दूर करते (Removes aging)-

रेड-वाइन-फायदेशीर

वाइन त्वचेला तरूण ठेवण्यास खूप फायदेशीर आहे. त्वचेच्या पेशींना चालना देण्यासाठी वाइन खूप चांगली असते, यामध्ये एँटीऑक्सीडेंट भरपूर प्रमाणात असते जे वृद्धत्वाची लक्षणे रोखण्यास मदत करते.

मुरुम कमी करते (Reduces pimples)-

वाइन असलेली उत्पादने त्वचेसाठी फायदेशीर असतात. यामुळे त्वचेवरील मुरमे दूर करण्यास मदत होते. यामध्ये एँटी इंफ्लेमेटेरी आणि एँटी सेप्टीक गुणधर्म असतात जे बॅक्टेरिया (जीवाणू) कमी करण्यास मदत करतात. एक्ने आणि मुरुमांच्या (pimples) समस्यांपासून मुक्त होण्यासाठी वाइन खूप फायदेशीर आहे.

त्वचेचा टोन सुधारते (Improves skin tone)-

रेड-वाइन

प्रदूषण आणि तणावाचा परिणाम आपल्या त्वचेवर पडतो. वाइन मध्ये हायट्रेटिंग गुणधर्म असतो जो त्वचेचा टोन वाढविण्यास मदत करतो. यामुळे आपल्या त्वचेचा रंग उजळ होतो.

नैसर्गिक चमक (Natural glow)-

वाइनमध्ये पोलीफिनॉल असते जे त्वचेच्या पेशींना चालना देण्यास मदत करते. यामुळे मृत त्वचा हटविण्यास मदत होते आणि त्वचेवर नैसर्गिक चमक येते.
Red wine is beneficial for skin, use it in this way for aging and smooth skin. Wine helps to keep the skin young. Also gives shine.


Beauty Tips : त्वचेच्या समस्यांपासून मुक्त होण्यासाठी केळीची साल उपयुक्त! –

Beauty Tips : चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी जाणून घ्या केळीच्या सालीचे फायदे…

Social Media