Beauty Tips : बटाट्याच्या वापराने चेहऱ्याचा रंग उजळतो…

तुम्हाला जर गोरे व्हायचे असेल तर ही माहिती तुमच्यासाठी योग्य आहे. कारण आम्ही तुमच्यासाठी एक घरगूती उपाय घेऊन आलो आहोत, ज्याद्वारे तुम्ही तुमचा रंग उजळ करू शकता. हा उपाय बटाट्याशी संबंधित आहे. बटाटा ज्याप्रकारे भाजीची चव वाढवितो, त्याच प्रकारे त्वचेची रंगत देखील वाढवितो. जर तुमच्या त्वचेवर एखादी खूण, डाग आणि रेषा असतील तर तुम्ही तुमच्या त्वचेवर उकडलेल्या बटाट्याद्वारे तयार होणारा फेसपॅक लावू शकता.

 उकडलेल्या बटाट्याचा फेसपॅक (Boiled potato face pack)-

जर तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या, टॅनिंग किंवा त्वचेचा रंग गडद असेल, तर उकडलेल्या बटाट्याचा फेसपॅक खूप फायदेशीर आहे. यासाठी उकडलेल्या बटाट्याची साल त्यामध्ये एक चमचा मध आणि एक चमचा मलई मिसळा, त्यानंतर हा फेसपॅक १५ मिनिटे चेहऱ्यावर लावा. सुखल्यानंतर चेहरा स्वच्छ धुवा. हा पॅक आठवड्यातून दोन वेळा लावा. जर तुमची त्वचा तेलकट असेल तर या फेसपॅक मध्ये बेसनचा वापर करा.

Beauty-Tips

 मुरूम दूर करण्यासाठी असा करा वापर (Use this way to get rid of pimples)-

जर तुमच्या चेहऱ्यावर मुरूमांची समस्या असेल तर तुम्ही उकडलेला बटाटा चागल्याप्रकारे बारीक करून त्यामध्ये मध मिसळून फेसपॅक सारखे चेहऱ्यावर लावा. हे आठवड्यातून दोन वेळा केल्यास तुम्हाला याचे खूप चांगले परिणाम दिसून येतील.

 चेहऱ्यावरील डाग कमी करणे (Use this way to remove stains)-

चेहऱ्यावरील डाग मिटविण्यासाठी बटाटा आणि हळदीचा पॅक तुम्ही वापरू शकता. यासाठी आर्धा बटाटा किसून त्यामध्ये हळद मिसळा आणि तो चेहऱ्यावर आणि मानेवर लावा. त्यानंतर अर्ध्या तासाने चेहरा साध्या पाण्याने स्वच्छ धुवून टाका. हा फेसपॅक नियमित लावल्याने चेहऱ्याचा रंग उजळ होतो.

डोळ्याखालील काळी वर्तुळे दूर करणे (Use this to remove dark circles)-

जर तुमच्या डोळ्याखाली काळे डाग असतील तर कच्च्या बटाट्याचे गोल काप डोळ्यांवर ठेवा. याशिवाय बटाट्याचा रस देखील डोळ्यांभोवती लावू शकता. यामुळे डोळ्याखालील काळी वर्तुळे दूर होण्यासह सूज देखील कमी होते.
Beauty tips: You can easily whiten the face with potatoes, just have to use it.


Beauty Tips : त्वचेतील वृद्धत्वाची समस्या रोखण्यासाठी रेड वाईन उपयुक्त –

Beauty Tips : त्वचेला तरूण आणि उजळ ठेवण्यासाठी रेड वाइन फायदेशीर!

Social Media