Beauty Tips : चेहर्‍यावरील चिकटपणा दूर करण्यासाठी वापरून पहा ‘हे’ तीन फेसपॅक……

मुंबई : चेहऱ्यावर नैसर्गिक चमक आणण्यासाठी नक्कीच आहाराची भूमिका महत्वाची आहे परंतु यासोबतच त्वचेची काळजी घेणे देखील तितकेच महत्वाचे आहे. हवामान बदलताच त्वचेची काळजी घेण्याची पद्धत देखील बदलते. पावसाळ्याच्या दिवसांत होणाऱ्या आर्द्रतेमुळे त्वचा चिकट बनते. अशा परिस्थितीत ही समस्या कशी टाळायची यासंदर्भात तुम्हालाही जाणून घेण्याची उत्सुकता असेलच.. आम्ही काही अशा फेसपॅक विषयी सांगणार आहोत जे या समस्येचे निराकरण करू शकतात.

केळ्याचा फेसपॅक (banana face pack) –

banana-face-pack

केळी त्वचेसाठी आणि केसांसाठी एक उत्कृष्ट फळ आहे. जे तुमच्या त्वचेला मऊ आणि चमकदार बनवते. याचा वापर तुम्ही अनेक प्रकारे करू शकता त्यापैकी दोन पद्धती आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

१. पिकलेले केळ घ्या आणि त्याला चांगल्याप्रकारे मॅश करा त्यामध्ये मध मिसळा. त्यानंतर हा फेसपॅक चेहऱ्यावर लावा कोरडे झाल्यानंतर साध्या पाण्याने चेहरा स्वच्छ करा.

२. पुदीन्याच्या पानांची बारीक पेस्ट करा त्यामध्ये मॅश केलेले केळ मिसळा याची मऊ पेस्ट तयार करून चेहऱ्यावर लावा. कमीत कमी १० मिनिटे ठेवून चेहरा कोमट पाण्याने धुवून टाका.

Beauty Tips : घरगुती उपाय करून ओठांवर पडलेले काळे डाग करा दूर!  – 

अंड्याचा फेसपॅक (egg face pack)-

Beauty-Tips

अंड्यामधील प्रथिने आरोग्यासह त्वचेसाठी देखील खूप फायदेशीर असते. जर तुमची त्वचा तेलकट असेल तर याचा वापर नक्की करून बघा. यासाठी अंड्याच्या पांढऱ्या बल्कमध्ये मध मिसळून चेहऱ्याला लावा. कोरडे झाल्यानंतर चेहरा साध्या पाण्याने स्वच्छ करा.

beauty-tips : त्वचा आणि केसांसाठी बीटाच्या मास्कचे फायदे – 

चंदन फेसपॅक (sandalwood face pack)-

Beauty-Tips

चंदन त्वचेला थंड ठेवण्यासह डाग-धब्बे देखील दूर करते. चंदनाचा वापर काही आठवडे केल्यानंतरच याचा फरक दिसून येईल. याचा फेसपॅक बनविण्यासाठी चंदन पावडर मध्ये हळद मिसळा आणि गुलाबपाणी टाकून मऊ पेस्ट तयार करा. चेहरा स्वच्छ केल्यानंतर फेसपॅक लावा आणि कमीत-कमी १५-२० मिनिटांपर्यंत ठेवा. त्यानंतर साध्या पाण्याने चेहरा धुवा.
Try these 3 face packs to stay away from the stickiness on the face in the rainy season.


Beauty Tips :चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल नियंत्रित करण्यासाठी बर्फाचा मसाज फायदेशीर! –

Beauty Tips : तेलकट त्वचेमुळे त्रस्त आहात? चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल नियंत्रित करण्यासाठी करा बर्फाने मसाज….

Beauty Tips :सुंदर त्वचेसाठी मूगडाळीचा करा असा वापर….. –

Beauty Tips : अतिरिक्त केसांची समस्या दूर करण्यासाठी लावा मूगडाळीचा फेसपॅक!

Social Media