Beauty Tips : आरोग्य, सौंदर्य आणि केसांची काळजी घेण्यासाठी असा करा कडूनिंबाचा वापर…..

मुंबई : कडुनिंबामधील लपलेल्या गुणधर्मांचा फायदा घेण्यासाठी याबाबत जाणून घेणे आवश्यक आहे. कडुनिंबाचे झाड जेथे असते तेथील सभोवतालचे वातावरण शुद्ध असते आणि आपल्या आरोग्यासाठी अनुकूल असते. त्याची पाने, फांद्या अनेक आजार दूर करण्यासाठी औषध म्हणून काम करते. भारतीय वेदांमध्ये कडुनिंबाचे नाव सर्व रोग निवारणी असे ठेवण्यात आले आहे, ज्याचा अर्थ असा आहे की ‘सर्व आजारांपासून बरे करणारा.’ कडुनिंबाचे दोन प्रकार असतात, कडू आणि गोड कडुलिंब. दोघांमध्ये देखील औषधी गुणधर्म आढळतात, परंतु कडव्या लिंबाचे फायदे अधिक आहेत आणि याचा वापर औषध निर्मितीसाठी अधिक होतो.

केस-गळती

आधुनिक संशोधनाने हे सिद्ध केले आहे की कडुनिंबाचे औषधी उपयोग आणि गुणधर्म आहेत, ज्याची कशाशीच तुलना नाही. कडुनिंबाचे तेल केसांच्या मुळाशी लावल्यास (स्काल्पवर) तेथे होणारा संसर्ग नष्ट होतो. ज्यामुळे केस गळती कमी होते. कडुनिंबाच्या तेलाचा नियमित वापर केल्याने केस अधिक वेगाने वाढतात.

 

१. डासांचा त्रास टाळण्यासाठी कडुनिंबाच्या पानांचा धुर किंवा तेल लावणे फायदेशीर आहे. त्वचेशी संबंधित समस्या असल्यास तुम्ही पाण्यात दोन थेंब कडुनिंबाच्य़ा पाण्याचे टाकून आंघोळ करू शकता. निंबाचे पाणी तयार करण्यासाठी अर्धालिटर पाण्यात ५० ग्रॅम पाने उकळा आणि त्यानंतर ते पाणी गाळून एका बॉटलमध्ये ठेवा.

२. त्वचेवर चमक आणण्यासाठी कडुनिंबाच्या पानांची पेस्ट करून चेहऱ्यावर लावा त्यानंतर थोड्या वेळाने चेहरा स्वच्छ धुवा. हे काही काळ नियमितपणे करा.

Beauty-Tips

३. जर भूक लागत नसेल किंवा खाण्याची इच्छा नसेल तर कडुलिंबाची कोवळी पाने तूपात भाजून खा. भूक लागण्यास सुरूवात होईल आणि अपचनाची समस्या दूर होईल.

४. कोणत्याही प्रकारची जखम भरुन काढण्यासाठी कडुनिंबाच्या तेलात थोडासा कापूर मिसळून लावल्यास फायदा होतो.
To take advantage of the hidden properties in neem, it is important to know about it. Where it happens, it keeps the environment around us pure and conducive to our health.


Beauty Tips : खुल्या छिद्रांपासून मुक्ती मिळविण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय! –

Beauty Tips : ‘या’ घरगुती उपायांमुळे चेहऱ्यावरील खुली छिद्रे होतात बंद!

Social Media