Beauty Tips : त्वचेच्या अनेक समस्यांपासून मुक्ती मिळविण्यासाठी वापरा केशर फेसपॅक!

Saffron Face Packs For Healthy Skin: केशर त्याच्या सुवासामुळे आणि गुणधर्माकरिता ओळखला जातो. हे खाण्यामुळे केवळ अन्नाची चव आणि मिठाईचा स्वादच वाढत नाही तर, आरोग्याला देखील याचा फायदा होतो. केशर रोग प्रतिकारकशक्ती वाढविण्यासह पचनाला तंदुरूस्त ठेवते. त्वचा आणि केसांसाठी देखील केशर खूप उपयोगी आहे. त्वचेवर चमक आणण्यासाठी सौदर्य उत्पादनांमध्ये केशरचा वापर अनेक वर्षांपासून केला जात आहे. हे त्वचेवर अँटी-फंगल म्हणून कार्य करते, ज्यामुळे त्वचा सुंदर आणि चमकदार बनते. याच्या वापरामुळे मृत त्वचेपासून मुक्ती मिळते, याशिवाय त्वचेचे टॅनिंग दूर होते आणि नैसर्गिकरित्या त्वचेचा रंग उजळतो. अनेक गुणधर्मांनी समृद्ध असलेल्या केशरचा वापर तुम्ही त्वचेच्या विविध समस्यांवर उपचार करण्यासाठी करू शकता. चला तर मग जाणून घेऊयात केशरचा फेसपॅक कोणत्या-कोणत्या समस्यांवर उपचार करण्यात फायदेशीर आहे.

त्वचेवर चमक आणण्यासाठी (Pack for skin brightening)

नैसर्गिकरित्या चेहऱ्यावर चमक आणण्यासाठी केशर आणि दूधाचा फेसपॅक लावा. हा फेसपॅक बनविण्यासाठी रात्रभर दूधात केशर भिजवा आणि सकाळी ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. २० मिनिटांनी चेहरा थंड पाण्याने धुवा.

पिंगमेन्टेशनपासून मुक्ती मिळविण्यासाठी (Pack to get rid of pigmentation)-

वय वाढण्यासह महिलांना पिंगमेन्टेशनची समस्या जाणवू लागते. पिंगमेन्टेशनची समस्या दूर करण्यासाठी केशरचा फेसपॅक वापरा. यासाठी एक मोठा चमचा केशर, आणि एक चमचा पपईचा लगदा, एक चमचा दही एकत्र करा. हे चांगल्याप्रकारे मिक्स करून ही पेस्ट क्लिन्झर म्हणून चेहरा आणि मानेला लावा. त्यानंतर चेहरा कोरडा झाला की थंड पाण्याने स्वच्छ धुवा.

मुरुमांपासून मुक्त होण्यासाठी फेसपॅक (Face pack to get rid of acne)-

केशर, हळद, कोरफड जेल आणि हळदीचा फेसपॅक चेहऱ्यावर टॉनिक म्हणून कार्य करते. मुरुम मुक्त चेहरा मिळविण्यासाठी केशर, कोरफड जेल आणि हळदीच्या मदतीने तयार केलेला फेसपॅक अत्यंत प्रभावी आहे. हा पॅक बनवण्यासाठी केशर, ३ चमचे कोरफड जेल, अर्धा चमचा हळद एकत्र मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहरा आणि मानेला लावा त्यानंतर चेहऱ्याचा मसाज करून २० मिनिटांनी चेहरा कोमट पाण्याने स्वच्छ धुवा.
Saffron Face Packs For Healthy Skin: If you want to treat skin problems in summer, then apply saffron pack, know the method.


Beauty Tips : केसांच्या सर्व समस्यांवर उपचार करेल अंड्याचा मास्क –

Beauty Tips : केसांच्या सर्व समस्यांवर उपचार करेल अंड्याचा मास्क; जाणून घ्या याची प्रक्रिया….

 

Social Media