Beauty Tips : अतिरिक्त केसांची समस्या दूर करण्यासाठी लावा मूगडाळीचा फेसपॅक!

मुंबई : मूगडाळीचे अनेक फायदे तुम्हाला माहित असतील परंतु तरीही आपल्या आहारात त्याचा अधिक समावेश केला जात नाही. मूगडाळीबाबत सांगायचे झाले तर सडपातळ शरीरापासून ते सुंदर त्वचेसाठी मूगडाळ खूप फायदेशीर आहे. अनेक तज्ज्ञ देखील याची पुष्टी देतात. चला तर मग कसे वापरायचे ते जाणून घेऊयात……

चेहऱ्यावर चमक आणण्यासाठी (To brighten the face)-

चेहऱ्यावर चमक आणण्यासाठी मूगडाळ रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. सकाळी याची मऊ पेस्ट तयार करा आणि या पेस्टमध्ये बदामाचे तेल, मध मिसळा. त्यानंतर ही पेस्ट चेहऱ्यावर लावून १५ मिनिटे तसेच ठेवा आणि चेहरा पाण्याने स्वच्छ धुवा.

त्वचा हायड्रेटेड ठेवण्यासाठी (to keep the skin hydrated)-

मूगडाळ रात्रभर कच्च्या दूधात भिजवून ठेवा. सकाळी याची पेस्ट बनवा आणि ही पेस्ट चेहऱ्यावर १५ मिनिटे लावून ठेवा. त्यानंतर पाण्याने चेहरा स्वच्छ करा.

अतिरिक्त केसांच्या समस्येतून मुक्त व्हा (get rid of unwanted hair) –

चार चमचे मूगडाळ पाण्यात रात्रभर भिजत ठेवा. सकाळी पेस्ट तयार करून यामध्ये दोन चमचे संत्र्याच्या सालीची पावडर आणि दोन चमचे चंदन पावडर मिसळा. पेस्ट घट्ट असल्यास थोडे दूध मिसळा. या पेस्टने चेहऱ्यावर कमीत कमी ७-८ मिनिटांपर्यंत स्क्रबिंग करा. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा. असे केल्यास चेहऱ्यावरील अतिरिक्त केस निघून जातात.

beauty-tips : त्वचा आणि केसांसाठी बीटाच्या मास्कचे फायदे – 

 टॅनिंगची समस्या दूर करण्यासाठी (remedy for tanning)-

टॅनिंगची समस्या दूर करण्यासाठी मूगडाळीच्या पेस्टमध्ये दही मिसळा आणि जेथे-जेथे टॅनिंगची समस्या आहे तेथे ही पेस्ट लावून १० मिनिटे ठेवा. त्यानंतर थंड पाण्याने ती जागा स्वच्छ करा. असे केल्यास टॅनिंगची समस्या दूर होण्यासह त्वचेची छिद्र देखील घट्ट होतात.

Beauty Tips : त्वचेचे सौंदर्य वाढविण्यात तमालपत्र प्रभावी! –

मुरूमांची समस्या दूर करण्यासाठी (Get rid of acne pimples)-

मूगडाळीच्या पेस्टमध्ये दोन चमचे तूप घाला आणि चांगल्याप्रकारे एकत्र करून हे चेहऱ्यावर लावा. नियमित याचा वापर केल्याने मुरूमांची समस्या तर दूर होईल याशिवाय त्वचा निरोगी आणि तरूण दिसेल.
Make your face glow with moong dal and get rid of unwanted hair.



Beauty Tips : त्वचेच्या अनेक समस्यांपासून मुक्ती मिळविण्यासाठी वापरा केशर फेसपॅक!

Beauty Tips : त्वचेच्या अनेक समस्यांपासून मुक्ती मिळविण्यासाठी वापरा केशर फेसपॅक!

Beauty Tips : केसांच्या सर्व समस्यांवर उपचार करेल अंड्याचा मास्क – 

Beauty Tips : केसांच्या सर्व समस्यांवर उपचार करेल अंड्याचा मास्क; जाणून घ्या याची प्रक्रिया….

Social Media