Beauty Tips : ‘या’ घरगुती उपायांमुळे चेहऱ्यावरील खुली छिद्रे होतात बंद!

Home Remedies To Get Rid Of Open Pores : तुम्ही कधी निरिक्षण केले आहे का तुमच्या त्वचेवर अनेक छोटे छोटे छिद्र असतात ज्याच्या मदतीने त्वचा श्वास घेते. प्रत्येक छिद्रात हेअर फॉलिकल आणि सेवासियस ग्रंथी असतात ज्या सेबम तयार करतात. त्याच्या मदतीने त्वचा हायड्रेटेड आणि मऊ राहते, परंतु जेव्हा हे खराब होऊ लागते तेव्हा कोलेजनच्या उत्पादनावर परिणाम होतो आणि चेहऱ्यावर वृद्धत्व दिसू लागते. हे वाढत्या वयामुळे आणि अती उष्णतेमुळे सर्वात अधिक खराब होते आणि त्यामुळे याची लवचिकता कमी होते.

 

लवचिकता कमी झाल्याने एकदा हे खुले झाल्यानंतर पुन्हा सहजरित्या बंद होत नाहीत आणि ब्लॅकहेड्स, मुरूमे, तेलकट आणि कोरड्या त्वचेची समस्या उद्भवते. त्वचेच्या खुल्या छिद्रांपासून (Open Pores) मुक्ती मिळविण्यासाठी तुम्ही अनेक प्रकारच्या उत्पादनांचा वापर करता परंतु कोणतेही परिणाम दिसून येत नाहीत. अशावेळी आम्ही काही घरगुती उपाय (Home Remedies) घेऊन आलो आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही त्वचेची छिद्रे सहजरित्या बंद करू शकता.

टोमॅटो ज्यूस (Tomato Juice)-

Tomato-Juice

एका वाटीमध्ये १ टोमॅटोचा रस घ्या त्यामध्ये एक चमचा लिंबाचे रस मिसळा त्यानंतर कापसाच्या मदतीने हे चेहऱ्यावर लावा आणि १५ मिनिटे ठेवा. कोरडे झाल्यानंतर चेहरा स्वच्छ धुवा. हे तुमच्या त्वचेवरील तेल शोषून घेईल आणि तुमची छिद्रे कमी दिसतील. हे तुम्ही आठवड्यातून दोनदा करू शकता.

अंड्याचा वापर (use of eggs)-

use-of-eggs

अंड्याचा पांढरा भाग एका वाटीत घ्या आणि त्यामध्ये लिंबाचे काही थेंब मिसळा हे संपूर्ण चेहऱ्यावर लावा आणि १५ मिनिटांनी चेहरा थंड पाण्याने धुवा.

मुल्तानी माती (use of multani mitti)-

use-of-multani-mitti

मुल्तानी मतीमध्ये गुलाब पाणी मिसळून त्याची पेस्ट तयार करा आणि ती चेहऱ्यावर लावा जेव्हा हे नैसर्गिकरित्या कोरडे होईल तेव्हा चेहरा थंड पाण्याने धुवा. यामुळे तेलकट त्वचेपासून मुक्ती मिळते आणि खुली छिद्रे देखील हळूहळू बंद होतात.
Are the open pores snatching away the glow of the skin? Follow these home remedies, it will be beneficial.


Beauty Tips : आरोग्य आणि सौंदर्यासाठी पुदीन्याचे तेल फायदेशीर! –

Beauty Tips : जाणून घ्या आरोग्य आणि सौंदर्यासाठी पुदीन्याच्या तेलाचे फायदे……

Social Media