भारत ठरला जगात सर्वाधिक लसीकरण करणारा देश!

नवी दिल्ली, Vaccination World Record India: भारत जगातील सर्वाधिक कोरोना लसीचा डोस देणारा देश बनला आहे. भारताने कोरोना लसीकरणाच्या बाबतीत अमेरिकेला मागे टाकले आहे.

भारताने कोरोना लसीकरणाच्या बाबतीत अमेरिकेला टाकले मागे…..

India surpasses US in corona vaccination

आतापर्यंत लसीकरणाच्या बाबतीत अमेरिका सर्वात पुढे होती परंतु भारताने आमेरिकेला देखील या प्रकरणात मागे टाकले आहे. ग्लोबल वॅक्सीन ट्रॅकरनुसार, भारतात आतापर्यंत कोरोना लसीचे ३२ कोटी ३६ लाख ६३ हजार २९७ डोस देण्यात आले आहेत, तर अमेरिकेत ३२ कोटी ३३ लाख २७ हजार ३२८ डोस देण्यात आले आहेत. या आधारे, भारताने अमेरिकेला लसीकरणाच्या बाबतीत मागे टाकले आहे. भारतात यावर्षी १६ जानेवारीपासून लसीकरणाची सुरूवात झाली होती तर, अमेरिकेत मागील वर्षी १४ डिसेंबरपासून लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली होती.

डेल्टा प्लस व्हेरिएंटला सभाव्य तिसऱ्या लाटेचे कारण मानने चुकीचे – 

कोरोना लसीकरणाच्या बाबतीत यूके तिसऱ्या क्रमांकावर आहे. यूके मध्ये आतापर्यंत ७ कोटी ६७ लाख ७४ हजार ९९० डोस देण्यात आले आहेत. चौथ्या क्रमांकावर जर्मनी असून येथे ७ कोटी १४ लाख ३७ हजार ५१४ डोस देण्यात आले आहेत. फ्रान्समध्ये आतापर्यंत कोरोना लसीचे ५ कोटी २४ लाख ५७ हजार २८८ डोस देण्यात आले आहेत. तर इटलीमध्ये कोरोना लसीचे ४ कोटी ९६ लाख ५० हजार ७२१ डोस देण्यात आले आहेत.
Vaccination World Record India: India overtakes America in Corona vaccination, becoming the world’s largest vaccination country.


डब्ल्यूएचओने सर्व श्रीमंत देशांना गरीब देशांसाठी लस उपलब्ध करून देण्याचे केले आवाहन! –

डब्ल्यूएचओने सर्व श्रीमंत देशांना गरीब देशांसाठी लस उपलब्ध करून देण्याचे केले आवाहन!

Social Media