मुंबईच्या रस्त्यांवरील वर्दळ सामान्य; बेस्ट आणि टॅक्सी नेहमीप्रमाणे धावल्या 

मुंबई :  दिल्लीत सुरु असणाऱ्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी पुकारण्यात आलेल्या ‘भारत बंद’ला आज  मुंबईत सकाळच्या सत्रात फारस प्रतिसाद मिळताना दिसला नाही. कारण, मुंबईच्या रस्त्यांवर आज सकाळपासूनच वाहनांची वर्दळ नेहमीप्रमाणे दिसत होती . बेस्ट बसेस, टॅक्सी आणि रिक्षा रस्त्यांवर नेहमीप्रमाणे धावत होत्या.

बेस्ट प्रशासनाने यापूर्वीच आम्ही ‘भारत बंद’ आंदोलनात सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून काही बसगाड्या आज बेस्टच्या बसेल लोखंडी जाळ्या लावून रस्त्यावर उतरवण्यात आल्या होत्या . तर दुसरीकडे मुंबईतील टॅक्सी – रिक्षा  संघटनेकडूनही मंगळवारी आपली सेवा सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे मुंबईच्या रस्त्यांवरील वर्दळ सामान्य होती.

सायंकाळी उशिरा मिळालेल्या माहितीनुसार बेस्ट च्या स्वतःच्या २ हजार ६७८ बस पैकी २ हजार ३६३ बस प्रवर्तनात  होत्या , तर भाडेतत्त्वावरील १ हजर ५६ बस पैकी ७४३ बस रस्त्यावर आल्या व एस टी च्या बेस्ट साठी  चालवण्यात येणाऱ्या   १ हजार बस पैकी ९५० बस रस्त्यावर धावत होत्या.

tag-best/taxi/mumbai

Social Media