भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131व्या जयंतीनिमित्त बैठक

मुंबई : भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131व्या जयंतीनिमित्त 14 एप्रिल रोजी चैत्यभूमी येथे आयोजित कार्यक्रमाच्या तयारीसंदर्भात आज सहयाद्री अतिथीगृह बैठकीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, राज्यमंत्री संजय बनसोड, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव,पोलीस महासंचालक रजनीश सेठ, पोलीस आयुक्त संजय पांडे, मा. खा. भालचंद्र मुणगेकर, समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे, आनंदराज आंबेडकर, भंतेजी राहुल बोधी, समन्वय समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर(Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar) हे महामानव होते. सुदैवाने कोरोनाचे सावट कमी झाले आहे, मात्र आरोग्याची योग्य ती काळजी घेऊन हा जयंती उत्सव आपण उत्साहाने साजरा करू यात. यासंदर्भात आवश्यक ते परिपत्रक गृह विभागाच्या वतीने लवकरात लवकर प्रसिद्ध केले जाईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सहयाद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीत सांगितले.

गेली दोन वर्षे डॉ बाबासाहेबांची जयंती उत्सव व पुण्यतिथीनिमित्त अभिवादन अशा दोन्हीही कार्यक्रमात आपण कोरोना निर्बंधांमुळे अतिशय संयम पाळला आणि नियमांचे काटेकोर पालन केले ही खरोखरच खूप मोठी गोष्ट आहे. आता हे सावट कमी झाले आहे आणि या महामानवाची जयंती आपणा सर्वांना उत्साहाने साजरी करायची आहे. महानगरपालिका आणि पोलीस यांनी नेहमीप्रमाणे संपूर्ण नियोजन व तयारी केली आहे. राज्यभरात देखील उत्साहाने तसेच आरोग्याचे नियम पाळून हा उत्सव साजरा करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

Social Media