भिम गर्जना प्रतिष्ठानच्या वतीने भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती जल्लोशात साजरी

मुंबई : भिम गर्जना प्रतिष्ठान कळंभे शहापूर यांच्या वतीने १३ एप्रिल २०२२ व १४ एप्रिल २०२२ अशा दोन दिवस भारतरत्न डाॅ . बाबासाहेब आंबेडकर यांची तसेच छत्रपती शिवाजी महाराज , महात्मा जोतिबा फुले , सावित्रीबाई फुले व छत्रपती शाहू महाराज या महापुरुषांची संयुक्त जयंती महोत्सव कळंभे ग्रामपंचायत समोरील मोकळ्या मैदानात आयोजित करण्यात आला. दोन दिवस चालणा-या या कार्यक्रमामध्ये १३ एप्रिल २०२२ रोजी सकाळी ११ : ०० वा आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते या मध्ये रक्त तपासणी , नेत्र तपासणी व रुग्णाची जनरल तपासणी करुन आवश्यक त्यांना औषध गोळ्याचे वाटप करण्यात आले.

या शिबिरासाठी उपजिल्हा रुग्णालय शहापूर , वासिंद पी. एच. सी. तसेच शेंद्रुण पी. एच. सी. यांचे विशेष सहकार्य लाभले यावेळी परिसरातील ८५ नागरीकांनी या शिबिराचा लाभ घेतला. याच दिवशी सायं. ७ वा . प्रतिष्ठानच्या वतीने भव्य गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते . या स्पर्धेस मुंबई , ठाणे व नाशिक जिल्ह्यातील ८० स्पर्धकांनी भाग घेतला यातील ३० स्पर्धक निवडण्यात आले व या स्पर्धकांमध्ये शहापूर आयडाॅल हि भव्य गीत गायन स्पर्धा पार पडली. अत्यंत रगंतदार अशा या स्पर्धेत खडावली दानबाव येथील गायक वैभव मोरे हा शहापूर आयडाॅल ठरला त्यास प्रथम क्रमांकाचे पारितोषिक म्हणून ११००० रु रोख व आकर्षक चषक देऊन सन्मानित करण्यात आले. विवेक कसबे याने द्वितीय क्रमांकाचे ५००० रोख व आकर्षक चषक जिंकला तर प्रसाद चव्हाण याने तृतीय क्रमांकाचे ३००० रु रोख व आकर्षक चषक जिंकला. या कार्यक्रमासाठी संगीत विशारद गंधार यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले तर रात्रीस खेळ चाले यात नाथाची भुमिका साकारणारे अभिनेते विकास थोरात व शाहीर उदेश उमप हे विशेष अतिथी म्हणून उपस्धित होते . भिम गर्जना प्रतिष्ठानच्या या स्पर्धेची चर्चा सर्वत्र होतांना दिसून येते.

१४ एप्रिल २०२२ रोजी सकाळी ११ : ०० वा जाहिर सभेचे आयोजन करण्यात आले . याप्रसंगी शिव – भिम व्याख्याता करुणाताई बांगर याचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते . त्यांनी उपस्धितांची मने जिंकली छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डाॅ . बाबासाहेब आंबेडकर यांचा जिवन प्रवास त्यांनी आपल्या व्याख्यानातुन मांडला.

या कार्यक्रमास प्रमुख पाहून म्हणून मा . गायत्रीताई भांगरे नगराध्यक्षा शहापूर नगरपंचायत , मा . ज्योतीताई गायकवाड अध्यक्षा रमाई ब्रिगेड, मा . सुजाताताई केदारे अध्यक्षा जिजाऊ महिला विकास आघाडी , मा . रेखाताई भानुशाली कार्याध्यक्षा, मा . मानसीताई चव्हाण कळंभे ग्रामपंचायत सदस्य , मा . जयवंत थोरात आर . पी . आय . शहापूर तालूका अध्यक्ष, मा . बबन गायकवाड सरचिटणीस, मा . रमेश साळवे अध्यक्ष जयंती महोत्सव कमिटी शहापूर, मा . अविनाश थोरात ठाणे जिल्हा अध्यक्ष सामाजिक न्याय , मा . घनश्याम गायकवाड संचालक भिमाई पतपेढी शहापूर , नगरपंचायतीचे नगरसेवक मा. हरेश पष्टे, मा . रणजित भोईर , मा विनोद कदम , मा . योगेश महाजन, मा. स्वप्निल भोईर उपतालूका प्रमुख युवा सेना , मा . चंद्रकांत भोईर शहापूर तालूका अध्यक्ष चर्मोद्योग कामगार सेना , मा . अविनाश किरपण माजी उप सरपंच कळंभे ग्रामपंचायत , मा . वसंतकुमार पानसरे प्रहार जनशक्ती पक्ष शहापूर तालुका अध्यक्ष , ग्रामविकास अधिकारी मा . मदन पाटील , मा . अशोक इरनक भाजपा नेते , मा . प्रशांत डोळसे सरचिटणीस ठाणे जिल्हा भाजपा , मा . प्रभाकर थोरात अध्यक्ष संविधान प्रतिष्ठान , मा . शिवाजी देशमुख अध्यक्ष साहेब प्रतिष्ठान , अतुल तेलवणे कळंभे शाखा प्रमुख आदी मान्यवर उपस्धित होते .
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भिम गर्जना प्रतिष्ठानचे मार्गदर्शक / सल्लागार सुनिल केदारे , दयानंद बोर्डे , मुकूंद भडांगे संस्थापक मंगेश भडांगे , अध्यक्ष मकरंद चव्हाण , उपाध्यक्ष सागर पहुरकर , स्वप्निल गायकवाड , जयंती महोत्सव कमिटी २०२२ चे अध्यक्ष सागर मोरे , उपाध्यक्ष आशिष वाघचौडे , संदिप कांबळे , सचिव गणेश कशिवले , सम्राट पहुरकर , खजिनदार महेश कशिवले यांनी विशेष परिश्रम घेतला कार्यक्रमाचे संयोजक सुमेध जाधव होते.


दिग्दर्शक जयंत गिलाटर यांच्या आगामी ‘विठ्ठल विठ्ठला’ चित्रपटात डॉ अमोल कोल्हे…

Social Media