आज मंत्रालयावर धडकणार हजारोंच्या संख्येने भीमसैनिक आंबेडकरी व संविधान प्रेमी नागरिक

परभणी : शहीद सोमनाथ सुर्यवंशी व लोकनेते विजय वाकोडे यांना न्याय देण्यासाठी आज ३ मार्च सोमवार रोजी आझाद मैदान मुंबई (Azad Maidan Mumbai)येथे सकाळी ११ वाजता आंबेडकरी जनतेच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे. राज्यसरकारला जाब विचारण्यासाठी मंत्रालयावर हजारोंच्या संख्येने राज्यभरातून हजारोंच्या संख्येनं भीमसैनिक आंबेडकरी समाज व संविधान प्रेमी नागरिक धडकणार असून सर्व आंबेडकरी संघटना सर्व पक्ष संविधान प्रेमी नागरिकाचा सहभाग राहणार आहे.

परभणीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar)यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिकृतीची सोपान निवृत्ती पवार यांनी तोडफोड विटंबना केल्याप्रकरणी ठीकठिकाणी आंबेडकरी व संविधान प्रेमी नागरिकांच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले. आंदोलकांना पोलिसांनी प्रचंड मारहाण केली शेकडो निरपराध महिला, अल्पवयीन तरुण वयोवृध्द अटक करून त्यांच्या वर गुन्हे दाखल करण्यात आले. यामध्ये सोमनाथ सुर्यवंशी यांचा पोलिसांच्या अमानुष मारहाणीमुळे मृत्यू झाला. दुसऱ्या दिवशी शांततेत निषेध आंदोलन करणारे आंबेडकरी लोकनेते विजय वाकोडे यांचा सुद्धा या आंदोलन दडपशाहीमुळे मानसिक धक्याने हृदय विकाराने मृत्यू झाला. या प्रकरणी न्याय मिळवून देण्यासाठी व विविध मागण्याच्या अंमलबजावणीसाठी शांततामय आंदोलन करण्यात येणार आहे.

या राज्यव्यापी आंदोलनास संविधान प्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ. सिद्धार्थभाऊ हत्तीअंबिरे समस्त आंबेडकरी संघटना संविधान प्रेमी नागरिकाच्या वतीने प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.

प्रमुख मागण्या

१)परभणीतील संविधान शिल्प प्रतिकृती विटंबना करणाऱ्या सोपान पवार याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा.

२)सोमनाथ सुर्यवंर्शीच्या मृत्यूची उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीकडून न्यायालयीन चौकशी करा.

३)सोमनाथ सुर्यवंशीच्या मृत्यूस जबाबदार पोलिसांवर हत्येचा ३०२ कलमान्वये मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना सेवेतून बडतर्फ करावे

४)सोमनाथ सुर्यवंशी व लोकनेते विजय वाकोडेंच्या कुटुंबियांना प्रत्येकी १ कोटी रुपये द्या. व कुटूंबातील १ व्यक्तीला शासकाच नाकरी द्यावी.

५)पोलीसांनी केलेल्या कोंबींग ऑपरेशन दरम्यान निरपराध भिमसैनिकांवरील दाखल केलेले गंभीर गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत.

६)पोलिसांनी केलेल्या बेदम मारहाणीत जखमी झालेल्या भीमसैनिकांना आर्थिक मदत द्यावी तसेच वत्सलाबाई मानवते या भगिनीला पोलसांनी गंभीर स्वरूपाची मारहाण केली मारहाण करणाऱ्या पोलिसांवर गुन्हा दाखल करावा व त्यांना आर्थिक मदत द्यावी

७)सोमनाथच्या हत्येस कारणीभुत असलेल्या संबंधीत पोलीसांवर अॅट्रॉसिटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करावा.

८)अन्यायग्रस्त नागरीकांनी दोषी पोलिसांवर जिल्हा पोलीस अधीक्षक लय येथे कलेल्या फिर्यादी दाखल करून घ्याव्यात..!

९)राज्य शासनाने फास्टट्रॅक कोर्ट मध्ये हा खटला चालवावा.

Social Media

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *