सह्याद्री गुजरातच्या उद्योगपतीला विकण्याचा डाव सहन करणार नाही: हर्षवर्धन सपकाळ

भीमाशंकर जंगलतोड : कर्जत-भीमाशंकर जंगलतोड प्रकरण: टोरंट प्रकल्पासाठी होत असल्याचा आरोप असलेल्या जंगलतोडीच्या मुद्द्यावरून महाराष्ट्राच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भीमाशंकर परिसरातील जंगलतोडीची पाहणी करत

भाजप महायुती सरकारवर टीका केली. सह्याद्रीच्या वनसंपदेचे संरक्षण करण्यासाठी गरज पडल्यास न्यायालयात जाण्याचा इशाराही त्यांनी दिला.

प्रकल्पामुळे रोजगारनिर्मिती आणि वृक्षारोपणाबाबत सरकारने केलेल्या घोषणांवरही सपकाळ यांनी प्रश्न उपस्थित केले.

भीमाशंकर जंगलतोड : छत्रपती शिवाजी महाराजांचा पावन सह्याद्री गुजरातच्या उद्योगपतीला विकण्याचे पाप महाराष्ट्र कदापी सहन करणार नाही : हर्षवर्धन सपकाळ

कर्जत/मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांचा पावन वारसा असलेल्या सह्याद्रीच्या कुशीतील समृद्ध वनसंपदेवर भाजपा महायुती सरकारने कुऱ्हाड

चालवली आहे. भ्रष्टाचाराची मलई खाण्याच्या नादात गुजरातच्या कंपनीला सह्याद्री विकला आहे. सह्याद्रीचा वारसा विकण्याचा भाजपा महायुती सरकारचा

प्रयत्न महाराष्ट्राची जनता कदापी सहन करणार नाही. भाजपा सरकार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सर्व मनसुबे हाणून पाडू, वेळप्रसंगी कर्जत

भिमाशंकरच्या वनसंपदेचे रक्षण करण्यासाठी न्यायालयात धाव घेऊ, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी

दिला आहे.

भीमाशंकर जंगलतोड : टोरंट प्रकल्पाच्या बचावाचे सरकारचे सर्व दावे खोटे, हजारो रोजगार व लाखो वृक्ष लावण्याची घोषणा पोकळ, ३३ कोटी झाडांचे काय झाले?

टोरंट कंपनीसाठी कर्जत भिमाशंकरच्या जंगलात होत असलेल्या झाडांच्या कत्तलीची पाहणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली व स्थानिक

गावकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना सपकाळ पुढे म्हणाले की, टोरंट कंपनीसाठी मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल केली जात

आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक पेड माँ के नाम’ हा संकल्प केला असताना महाराष्ट्रात मात्र झाडांची कत्तल केली जात आहे. पंतप्रधानांचा संकल्प

आम्ही आज कर्जतच्या जंगलात वृक्षारोपण करून पूर्ण केला. भाजपा सरकार भ्रष्टाचारात आकंठ बुडाले असून महाराष्ट्र विकायला काढला आहेच पण

आता कमीशनसाठी निसर्गही विकायला काढला आहे.कर्जत भिमाशंकरच्या जंगलात होत असलेला हा प्रकल्प महाराष्ट्राच्या हिताचा नाही. या प्रकल्पातून

हजारो रोजगार निर्माण होतील, या वृक्षतोडीच्या बदल्यात दुसरीकडे लाखो झाडे लावू या केवळ पोकळ घोषणा आहेत. याआधी याच सरकारने ३३ कोटी

झाडे लावण्याचा संकल्प केला होता त्याचे काय झाले. यातील एकही झाड कोणी पाहिले नाही. हा प्रकल्प अत्याधुनिक असल्याचे सरकार सांगत आहे मग

हजारो रोजगार कुठून येणार. मुळात भाजपा सरकार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बोलण्यावर कोणाचाही विश्वास नाही. ते महाराष्ट्राची दिशाभूल

करत असून फेक नेरेटिव्ह पसरवत आहेत.

विधान परिषद निकालाने सत्तेचे गर्वहरण झाले..

राज्यातील विधान परिषदेच्या ५ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीने नागपूर, पुणे, संभाजीनगर मधील तीन जागा जिंकून महायुती

सरकारचा धुव्वा उडवला. निकाल सुरु असतानाच घाईघाईत पंतप्रधान व मुख्यमंत्री यांनी काँग्रेसला हिनवणारे ट्विट केले होते पण निकाल येताच हे ट्विट

त्यांना डिलीट करावे लागले. पंतप्रधानपद हे प्रतिष्ठेचे पद आहे, नरेंद्र मोदींनी असा चिल्लरपणा करणे पदाला शोभत नाही. नागपूर या रा. स्व. संघाच्या भूमीत,

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या शहरातच सलग दसऱ्यांदा पराभवाची धूळ चारली. हा निकाल सत्तेच्या अहंकाराचे गर्वहरण

करणारा आहे. फडणवीस यांनी स्वतः नागपूरच्या निवडणुकीत स्रव शक्तीपणाला लावली होती पण नागपुरमध्येच त्यांचे नाक कापले आहे, हा निकाल

परिवर्तानाची नांदी आहे, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले..

उद्या वाढवण बंदर विरोधी जनआदोलनाला भेट.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे उद्या शुक्रवार दिनांक ३० ऑक्टोबर २०२६ रोजी वाढवण बंदर जि. पालघर येथे जनआंदोलनात सहभागी

होणार आहेत.

 

Published by – SanvadMedia

Social Media