राज्य शासनाच्या मोफत गणवेश योजनेअंतर्गत(free uniform scheme) शालेय शिक्षण विभागाने राज्यातील विद्यार्थ्यांसाठी गणेशवाचे इयत्तानिहाय स्वरूप निश्चित केले आहे.
त्यानुसार पहिली ते चौथीच्या मुलींना पिनो फ्रॉक, पाचवी ते सातवीच्या मुलींना शर्ट आणि स्कर्ट, आठवीच्या मुलींसाठी सलवाज कमीज ओढणी, तर पहिली ते सातवीच्या मुलांना हाफ शर्ट आणि हाफ पँट, तर आठवीच्या मुलांना हाफ शर्ट आणि फुल पँट असा गणवेश(uniform) दिला जाणार आहे.
या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाकडून इयत्तानिहाय गणवेशाचे स्वरूप निश्चित करण्यात आले आहे. शालेय शिक्षण विभागाने याबाबतचे पत्रक प्रसिद्ध केले आहे.
नव्या स्वरुपाच्या गणवेशाची अंमलबजावणी शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून समग्र शिक्षा योजनेअंतर्गत करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.