22वे कॉमनवेल्थ गेम्स (Birmingham 2022 Commonwealth Games) बर्मिंगहॅममध्ये खेळले जात आहेत. 1934 मध्ये लंडन आणि 2002 मध्ये मँचेस्टरनंतर इंग्लंडमध्ये तिसऱ्यांदा कॉमनवेल्थ गेम्स(Commonwealth Games) खेळवले जात आहेत. २०१० मध्ये भारतात एकदाच राष्ट्रकुल खेळांचे आयोजन करण्यात आले होते आणि राष्ट्रकुल खेळांच्या इतिहासात भारताने २०१० सालीच सर्वोत्तम कामगिरी केली होती.
2010 मध्ये दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने 39 सुवर्णपदके जिंकली होती. सुवर्णाव्यतिरिक्त, भारताच्या नावे 26 रौप्य आणि 36 कांस्य पदकांसह एकूण 101 पदके आहेत. यावेळी बर्मिंगहॅम येथे खेळल्या जाणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेतही भारतीय खेळाडूंकडून चांगली कामगिरी अपेक्षित आहे. मात्र, यावेळी नेमबाजीचा त्यात समावेश नाही, तर महिला टी-२० क्रिकेटला राष्ट्रकुल स्पर्धेत स्थान देण्यात आले आहे.
बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्समध्ये 72 देश सहभागी होत आहेत. यादरम्यान हे संघ विविध १९ खेळांमध्ये पदकांसाठी झगडत आहेत. यावेळी या 72 देशांचे खेळाडू 1800 हून अधिक पदकांसाठी बर्मिंगहॅममध्ये जमले आहेत. महिला T20 क्रिकेट, 3X3 बास्केटबॉल आणि 3X3 व्हील चेअर बास्केटबॉल या तीन नवीन खेळांना येथे स्थान देण्यात आले आहे.