भारतीय जनता पक्षाने विश्वासघात केल्याने भाजप सोडली मात्र हिंदुत्व सोडले नाही; अमित शहा यांनी दिलेले एकट्याच्या बळावर लढण्याचे आव्हान स्विकारले : उध्दव ठाकरेंची गर्जना!

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्ताने कार्यकर्त्यांशी संवाद साधताना मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाने विश्वासघात केल्याने भाजप सोडली मात्र हिंदुत्व सोडले नसल्याचे सांगितले. पुण्यात  गृहमंत्री अमित शहा यांनी दिलेले एकट्याच्या बळावर लढण्याचे आव्हान स्विकारले असल्याचे सांगितले. त्यानी शिवसैनिकांना यापुढे संघटनात्मक शक्ती संस्थात्मक पध्दतीने वाढवत स्थानिक पासून सगळ्या देशभरातील निवडणुकां जिकंण्याच्या आत्मविश्वासाने लढा छत्रपतींचा भगवा बाळासाहेबांनी हाती दिला आहे त्याचे मोल कमी होवू देवू नका असे आवाहन केले.

कोरोनांच्या येतात तशी शिवसेनेची लाट येवू शकते

भाषणाच्या सुरुवातीलाच उध्दव ठाकरे यांनी आपल्या तब्येतीच्या कारणावरून टिका करणा-यांचा कडवट शब्दात समाचार घेतला ते म्हणाले की, पहिल्या आणि दुस-या लाटेनंतर आता कोरोनांच्या लाटा येतायेत तशी शिवसेनेची लाट का येवू शकते.       भगव्यांचा वारसा आहे, ती लाट यायला हवी. दिल्ली काबीज करण्याचे स्वप्न शिवसेनाप्रमुखांचे पूर्ण करायचे आहे.  त्यामुळे दिल्लीत पुतळा तर उभारुच असे ते म्हणाले.

काळजीवाहू विरोधकांना त्यांची जागा दाखवणार

ते म्हणाले की,   लवकरात लवकर बाहेर पडणार आणि महाराष्ट्र पिंजून काढणार आहे आणि आपली काळजी दाखविणा-या काळजीवाहू विरोधकांना त्यांची जागा दाखवणार आहे.  २५ वर्ष आपण युतीत सडलो, ही भूमिका आजही कायम आहे असे सांगत ते म्हणाले की जर भाजपमुळे शिवसेना वाढली असे कुणी म्हणत असेल तर भाजपाचे डिपॉझीट जप्त होत होते तेंव्हा शिवसेनेने त्यांना पोसले आहे असेही आम्ही म्हणू शकतो, पण बाळासाहेब नेहमी म्हणत तसे हे  राजकारणातील गजकरण आहे खाजवले तेवढे वाडत जाते.

भाजपाने पोकळ, हिंदुत्वाचे कातडे पांघरलेले आहे

शिवसेना हिंदुत्वाच्या मुद्यावर सोबत आली असे सांगत ते म्हणाले की भाजपाचं हिंदूत्व पोकळ, हिंदुत्वाचे कातडे पांघरलेले आहे.  मात्र शिवसेनेने भाजपला सोडल्याने हिंदुत्वापासून दूर गेलो नाही, ते म्हणाले की, शिवसेनेची एकट्याने लढायची तयारी आहे, तुमचे अधिकार ईडी, आयकर तुम्ही वापरु नका, आम्ही आमचे वापरत नाही, होऊन जाऊ द्या.  ते म्हणाले की भाजपने सर्वच सहकारी पक्षांसोबत सोयीचे राजकारण केले. नव हिंदूत्ववादी, हिंददुंत्वाचा वापर स्वार्थासाठी करणारे आमच्यासोबत नाहीत. सत्तेसाठी पीडीपी, नितीश, चंद्राबाबूंशी युती केली. मात्र आम्ही काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत जाऊन लोकशाहीचा अपमान केला असे म्हणत असाल तर आम्ही काहीच चुकीचे केले नाही असे त्यांनी स्पष्ट केले.. ते म्हणाले की आम्ही चोरून पहाटे शपथविधी केला नाही. जे काही केले ते उघडपणे केले आहे.

देशभर खरे हिंदूत्व घेऊन सर्व निवडणुका लढवायच्या

त्यांनी शिवसैनिकांना सांगितले की या पुढच्या काळात देशभर खरे हिंदूत्व घेऊन सर्व ठिकाणी निवडणुका लढवायच्या. इतर राज्यांतही लढवणार., अपयश आले तरी चालेल.  नगरपंचायत निवडणुकीत नंबर चारवर असण्यावरुन टीका होत असली तरी शिवसेनेची संख्या जास्त आहे.  मात्र माझ्यासह नेत्यांनी या निवडणुकीत पाहीजे तेवढे लक्ष दिले नाही ही सर्वाची चूकच आहे ती माझी देखील आहे असे ते म्हणाले. नाही. नगर पंचायत आणि विधानपरिषद दोन जागा सोडल्या. आपल्यात कुणी गद्दारी केली आहे का असा सवाल करत ते म्हणाले की गद्दारी केली असेल तर निघा. त्यापेक्षा सोडून गेलात तरी चालेल मूठभर शिवसैनिकही चांगले काम करतील.

 सर्व निवडणुका जिद्दीने लढा

मुख्यमंत्री म्हणाले की, सत्तेचा दुरगामी उपयोग हवा. कारखाने, संस्था काढा. संस्थात्मक पक्षांची वाढ कशी होईल यावर लक्ष द्यायला हवे नाहीतर सत्ता मिळाली त्याचा काही उपयोग होणार नाही.  त्यांनी पश्चिम बंगाल मधील ममतां बँनर्जीचे उदाहरण देत त्यांचा आदर्श ठेवण्याचा सल्ला दिला. या पढच्या काळात स्था. स्वराज्य संस्थेच्या निवडणुकासह सर्व निवडणुका जिद्दीने लडा असे ते म्हणाले,

वापरुन फेकून द्या, असे भाजपाची धोरण

मुख्यमंत्री म्हणाले की, ज्यावेळी बाबरी मशीद पाडली त्यानंतर शिवसेनेची भुमिका होती म्हणून सा-यांना बळ मिळाले त्यावेळी आम्ही विश्वास ठेवला नाहीतर सीमोल्लंघन केले असते तर शिवसेनेचा पंतप्रधान दिसला असता.  मात्र शिवसेनेचा वापर भाजपने केला. वापरुन द्या आणि फेकून द्या, असे भाजपाची धोरण आहे मात्र आता गप्प बसलो तर गुलामगिरी नशिबी येईल.

भगव्याचे मोल कमी होवू देवू नका

आणीबाणीची आठवण काढणारेच हेच लोक आता आपल्याला लोकशाही हक्कापासून वंचित करीत आहेत. त्यामुळे निवडणूक जिंकायचीच या इर्षेने  आत्मविश्वासाने निवडणूक लढा, मात्र फाजील आत्मविश्वासाने नको, कारण बाळासाहेबांनी शिवरायांचा भगवा आपल्या हाती दिला आहे त्यांची परंपरा आहे त्याचे मोल कमी होवू देवू नका असे ते म्हणाले.

Social Media