नागपूर शहरात महिलांच्या पुढाकाराने रक्तदान शिबिर

नागपूर : आदरणीय शरद पवार साहेबांच्या वाढदिवस सप्ताह निमित्ताने रक्त दान शिबिराचे आयोजन उत्तर नागपूर मोठो बुद्ध विहार येथे करण्यात आले. कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेल प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे होते तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला अध्यक्षा मा.अलकाताई कांबळे ह्या तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सन्माननीय महेंद्र भांगे, सुनील लांजेवार, प्रविण मांडे, रूद्रा धाकडे, संदिप मेंढे, किरण दिडसे उपस्थित होते.

रक्तदान शिबिराचे आयोजन जोती मेश्राम. उत्तर नागपूर राष्ट्रवादी महिला काँग्रेस कार्याध्यक्षा यांनी केले. याप्रसंगी मोठ्या संख्येने इच्छुक रक्तदात्यांनी रक्तदान केले. कार्यक्रमाचे संचालन किरण दिडसे यांनी केले तर आभार प्रदर्शन सुधा जैन यांनी केले.

Tag-Blood donation camp/Nagpur

Social Media