नवी दिल्ली : कोव्हिड-१९ ची दुसरी लाट गेल्यानंतर लोकांचे जीवन पुन्हा रूळावर येऊ लागले आहे. परंतु दुसरी लाट संपल्यानंतर लोकांमध्ये प्रचंड निष्काळजीपणा दिसून येत आहे ज्यामुळे तिसरी लाट येण्याचा धोका आणखी वाढला आहे. सरकारद्वारे लोकांना सतत सावधगिरी बाळण्याचा आणि योग्य अंतर राखण्याचा सल्ला दिला जात आहे, परंतु लोक स्पष्टपणे नियमांचे उल्लंघन करीत आहेत.
आता लोकांचे वाढते दुर्लक्ष आणि कोव्हिड-१९ च्या नवीन डेल्टा व्हेरिएंटची प्रकरणे समोर येण्यादरम्यान बीएमसीने (मुंबई महानगरपालिकेने) मुंबईतील ‘पृथ्वी अपार्टमेंट्स’ पूर्णपणे सील केले आहे. हे तेच अपार्टमेंट आहे जिथे बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी यांचे कुटुंब राहते. तथापि, दिलासा देणारी बाब अशी आहे की, अभिनेत्याचे कुटुंब पूर्णपणे सुरक्षित आहे. बीएमसीने हे पाऊल खबरदारी म्हणून उचलले आहे.
रकुल प्रीत सिंगने टॉलिवूडमध्ये काम मिळत नसल्याच्या वृत्ताचे केले खंडन.. –
मिळालेल्या माहितीनुसार या अभिनेत्याच्या अपार्टमेंटमध्ये कोव्हिड-१९ च्या डेल्टा व्हेरिएंटची तीन प्रकरणे आढळून आली आहेत त्यानंतर बीएमसीने संपूर्ण इमारत सील केली आहे. नियमानुसार एखाद्या इमारतीत पाच किंवा त्याहून अधिक कोरोना प्रकरणे आढळल्यास ती इमारत सील करणे आवश्यक आहे.
तमिळ सुपरहिट चित्रपट ‘रत्सासन’ च्या हिंदी रिमेकमध्ये अक्षय कुमारची वर्णी… –
मुंबई महानगरपालिकेचे सहायक आयुक्त यांनी माध्यमांशी बोलताना या गोष्टीची पुष्टी केली आहे आणि म्हटले आहे की, कोव्हिडची काही प्रकरणे समोर आल्यानंतर बीएमसीने दक्षिण मुंबईतील अल्तामाउंट रोड येथील पृथ्वी अपार्टमेंटला सील केले आहे. तसेच त्यांनी अशीही माहिती दिली की, अभिनेत्याचे संपूर्ण कुटुंब सुरक्षित आहे.
BMC seals Sunil Shetty’s building amid rising Covid cases, actor’s family safe.
कृती सेनॉनचा ‘मिमी’ चित्रपट लवकरच OTT प्लॅटफॉर्म होणार प्रदर्शित! –
कृती सेनॉनचा ‘मिमी’ चित्रपट लवकरच OTT प्लॅटफॉर्म होणार प्रदर्शित!
अजय देवगणच्या ‘भुज : द प्राइड ऑफ इंडिया’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख निश्चित…. –
अजय देवगणचा ‘भुज : द प्राइड ऑफ इंडिया’ चित्रपट १३ ऑगस्टला OTT वर होणार प्रदर्शित!