सर्वांनाच रेल्वे प्रवासासाठी आता दोन्ही लशीची अट अनिवार्य : राज्य सरकारचे सुधारीत आदेश निर्गमीत!

मुंबई : राज्यातील वैद्यकीय सेवा, दूरसंचार क्षेत्र, गॅस पुरवठा, जलपुरवठा अश्या अत्यावश्यक सेवेतील (essential services)शासकीय बिगरशासकीय अधिकारी कर्मचार-याना रेल्वे प्रवासासह अन्य सुविधांसाठी दोन्ही लस घेणे अनिवार्य करण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवे वर विपरित परिणाम होऊ नये म्हणून त्यांनी लस घेतली असेल किंवा नसेल त्याचा विचार न करता त्यांना या पूर्वी मासिक पास देण्यात येत होते.

सर्वांना लसीकरण अनिवार्य(Vaccination mandatory for all)

राज्य शासनातर्फे मुख्य सचिव यांच्या स्वाक्षरीबे जारी एका परिपत्रकात असे म्हटले आहे की, आवश्यक सेवेत काम करणाऱ्यांना आतापर्यंत त्यांनी लस घेतली आहे किंवा नाही हे ना बघता त्यांना पास देण्यात येत होते परंतु आता लसीकरणाला (Vaccination)सुरुवात होऊन बराच वेळ झालेला आहे. त्याचप्रमाणे लसीकरणाची प्रक्रिया गतीने चालू आहे आणि लसींचा साठा ही मुबलक आहे. त्याच प्रमाणे सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील संस्थांमार्फत लसींचा पुरवठा ही सुरळीत होत आहे.

संपूर्ण लसीकरण व्याख्या सर्वांना लागू(Full vaccination definition applicable to all)

पत्रकात पुढे असे ही म्हटले आहे की, राज्य शासनाने ०८ ऑक्टोबर २०२१ रोजी लसीकरण झालेल्या व्यक्तींची व्याख्या केली होती. त्यामध्ये ज्या लोकांनी दोन्ही डोस घेतले आहे आणि दुसरा डोस घेतल्यानंतर १४ दिवस लोटले आहे अशी व्यक्ती, वैद्यकीय कारणास्तव लस ना घेऊ शकणारे व्यक्ती तसेच वृद्धापकाळामुळे लस ना होऊ शकणारे लोक सामील आहेत.

पूर्ण लसीकरणाच्या अटीचा विस्तार(Extension of full immunization conditions)

पुढे असेही म्हटले आहे की, लोकल ट्रेन मध्ये प्रवास करण्यासाठी तसेच इतर कारणांसाठी पूर्ण लसीकरणाची अट घालण्यात आली होती याचा विस्तार करून आता यात आवश्यक सेवेतील तसेच शासकीय सेवेतील लोकांना सामील करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे यापुढे प्रवासासाठी सार्वत्रिक (युनिव्हर्सल )पास अशाच व्यक्तींना दिला जाईल जे आवश्यक सेवेतील असो किंवा नसो परंतु वरील “संपूर्ण लसीकरण” झालेल्या व्यक्तींच्या व्याख्येत मोडतील. त्याचप्रमाणे लोकल किंवा पॅसेंजर ट्रेन ने प्रवास करणाऱ्या लोकांसाठी मासिक त्रेमासिक सहा मासिक पास त्याचा प्रवाशांना देण्यात येईल चे संपूर्ण लसीकरण झालेल्यांमध्ये वरील व्याख्येप्रमाणे गणले जातील.असे एका पत्रकाद्वारे प्रसिद्धीस दिले आहे.

Government non-government officials in essential services like medical services, telecom sector, gas supply, water supply in the state have been made mandatory to get both vaccines for other facilities including rail travel. They were earlier given monthly passes irrespective of whether they had taken the vaccine or not to adversely affect the essential services.

Social Media