‘बीपीसीएल’ कंपनीच्या नफ्यात ७ टक्क्यांनी वाढ, शेअरधारकांना मिळणार लाभांश

नवी दिल्ली : भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड (BPCL) या सार्वजनिक कंपनीचा नफा सात पटीने वाढून १९,०४१.६७ कोटी रूपयांपर्यंत पोहोचला आहे. कंपनी आपल्या शेअरधारकांना (समभागधारकांना) प्रति शेअर 58 रुपयांचा लाभांश देणार आहे. ही तीच कंपनी आहे जिचे सरकार खासगीकरण करण्याची तयारी करीत आहे. बीपीसीएलद्वारे बुधवारी जारी केलेल्या निकालांनुसार, ३१ मार्च रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात २०२०-२१ मध्ये त्यांचे नेट प्रॉफिट (नफा) ६१० टक्क्यांनी वाढून १९,०४१.६७ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. गेल्या आर्थिक वर्षात म्हणजेच २०१९-२० मध्ये कंपनीला २,६८३.१९ कोटी रूपयांचा नफा झाला होता.

‘बीपीसीएल’ कंपनीचे या वित्तीय वर्षात खासगीकरण करण्याची सरकारची तयारी!

Government ready to privatise BPCL company this financial year!

सरकारने बीपीसीएलच्या खासगीकरणाची योजना या आर्थिक वर्षात पूर्ण करण्याचे ठरवले आहे. सरकार बीपीसीएल मधील आपली सर्व ५२.९८ टक्के भागीदारी विकत आहे. याला
आतापर्यंत देशातील सर्वात मोठे खाजगीकरण असल्याचे म्हटले जात आहे. मुख्य आर्थिक सल्लागार (सीईए) कृष्णमूर्ती सुब्रमण्यम यांनी नुकतेच म्हटले आहे की, बीपीसीएलच्या निर्गुंतवणुकीमुळे ८० हजार कोटी रुपयांचा महसूल मिळू शकतो.

आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये कंपनीने ३,०१,८६४.९८ कोटी रुपयांची कमाई केली आहे. या दरम्यान कंपनीचे एकूण उत्पन्न साधारण घसरणीसह ३०६,२०९.४३ कोटी रुपये एवढे होते. गेल्या आर्थिक वर्षात कंपनीला ३३०,६६२.०९ कोटी रूपयांचे एकूण उत्पन्न झाले होते. कंपनीचे म्हणणे आहे की सरकारद्वारे मिळालेल्या आर्थिक पाठिंब्यामुळे त्यांना त्यांच्या विक्रेत्यांना नुकसान भरपाई देण्याची गरज भासली नाही.
The profit of public company Bharat Petroleum Corporation Limited (BPCL) has increased seven times to Rs 19,041.67 crore.


चेकबुक आणि रोख रक्कम काढण्यासाठी आता शुल्क द्यावे लागणार

एसबीआय खातेदारांना धक्का! नवीन नियम १ जुलैपासून लागू..

Social Media