मुंबई : अभिनेत्री केतकी चितळेच्या फेसबुक अकाऊंटवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्यानंतर अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाकडूनही यावर आक्षेप घेत अश्या आजारावर शिक्षाही झालीच पाहिजे अशी भुमिका घेण्यात आली आहे.
कोणत्याही व्यक्तीच्या आजारावर उपहासात्मक लिहिणे ही एक विकृतीच आहे, अशी स्पष्ट भूमिका अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या आनंद दवे यांनी घेतली आहे. त्यानी म्हटले आहे की, आमचे राष्ट्रवादी काँग्रेससोबतचे वैचारिक शत्रूत्व कायम आहे आणि भविष्यातही आम्ही तितक्याच ताकदीने लढत राहू.
परंतु कोणत्याही व्यक्तीच्या आजारावर उपहासात्मक लिहिणे, त्यांच्या मरणाची वाट पाहणे ही विकृतीच आहे. आनंद दवे यांनी म्हटले आहे की या आजाराला शिक्षा ही झालीच पाहिजे.