ड्रॅगन पॅलेस मध्ये बुद्ध पौर्णिमा उत्साहात साजरी

नागपूर : भगवान गौतम बुद्ध (Lord Gautama Buddha)यांनी सत्य, अहिंसा आणि करूणेची शिकवण विश्वाला दिली. मानवतेचा संदेश सर्वदूर पोहचवणारे सिध्दार्थ गौतम म्हणजे भगवान गौतम बुद्ध यांची बुध्द पौर्णिमा(Buddha Purnima) कामठी येथील ड्रॅगन पॅलेस येथे उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळेला विशेष बुध्द वंदनेचे देखील आयोजन करण्यात आलेले होते.बुध्द पौर्णिमेच्या औचित्यावर विशेष बुध्द वंदना आणि धम्मदेसना परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी चे प्रमुख भंते नाग दिपंकर यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली. महापरित्तदेसना व महापरित्राण पाठ देखील करण्यात आले.

या प्रसंगी ड्रॅगन पॅलेस (Dragon Palace)टेम्पलच्या प्रमुख आणि माजी राज्यमंत्री अँड सुलेखा कुंभारे यांच्या हस्ते उपस्थित भिक्खु संघाला कठीण चिवरदान व भोजनदान देण्यात आले. वैशाख बुध्द पौर्णिमेच्या निमित्ताने महापरित्राण पाठ सामूहिक विपश्यना ध्यान साधना, धम्मदेसना, शांती कैंडल मार्च इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन १५ व १६ मे रोजी करण्यात आले आहे.

या निमित्त धम्म सभागृहाच्या केंद्रबिंदू असलेल्या ८५० किलो वजनी चंदनाच्या तथागत भगवान गौतम बुध्दांच्या मूर्तीला सुध्दा विविध रंगीबिरंगी फुलांनी सजविण्यात आले आहे.


अभिनेत्री केतकी चितळे पोलिसांच्या ताब्यात

 

Social Media