वक्फ (दुरुस्ती) विधेयक लोकसभेत मंजूर
नवी दिल्ली, ०३ एप्रिल : वक्फ (दुरुस्ती) विधेयकाला लोकसभेत २८८ मतांनी मंजुरी मिळाली असून, यामुळे पारदर्शकता, प्रशासनिक सुधारणा आणि सर्वसमावेशकतेसाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेले आहे. या विधेयकामुळे कोणाच्याही जमिनी बेकायदेशीरपणे बळकावल्या जाणार नाहीत, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.Cabinet Minister Mangal Prabhat Lodha
यावर प्रतिक्रिया देताना कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले, “पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वातील सरकारने देशातीळ नागरिकांना न्याय देण्यासाठी हे विधेयक आणले आहे. त्याबद्दल पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी, गृहमंत्री आदरणीय अमित शाहजी आणि सर्वांचेच मनःपूर्वक अभिनंदन करतो. आदरणीय पंतप्रधानांच्या तिसऱ्या कार्यकाळातील हे अतिशय महत्वाचे विधायक आहे. या विधेयकामुळे पारदर्शकता वाढेल आणि सामान्य नागरिकांचे हक्क संरक्षित होतील. विरोधकांनी या आधीही कलम 370, CAA आणि राम मंदिराबाबत भीती पसरवण्याचा प्रयत्न केला, पण प्रत्यक्षात कोणत्याही समाजाच्या हक्कांवर कुठलाही आघात झाला नाही.”
त्यांनी पुढे सांगितले की, “आपले सरकार सबका साथ, सबका विकास या धोरणावर ठाम आहे. पीडित नागरिकांचे रक्षण करणे आणि त्यांना न्याय मिळवून देणे, हेच आमचे उद्दिष्ट आहे. या विधेयकामुळे गरिबांच्या जमिनी आता बळकावल्या जाणार नाहीत. खोट्या व्यवहारांमुळे नुकसान होणार नाही आणि वक्फ मालमत्तांबाबत होणाऱ्या गैरव्यवहारांवर अंकुश येईल. जमीन हस्तांतरण प्रक्रियेत पारदर्शकता आणणारे हे विधेयक ऐतिहासिक ठरेल. विरोधकांनी या विधेयकावर टीका केली असली, तरी लोकसभेत झालेल्या मतदानावरून बहुसंख्य खासदारांनी या कायद्याला पाठिंबा दर्शवला आहे.”
The Waqf (Amendment) Bill was passed by the Lok Sabha by a vote of 288, taking an important step towards transparency, administrative reforms and inclusiveness. The central government has made it clear that no one’s land will be illegally grabbed due to this bill.