Vaccine Tourism : भारतीय नागरिक इतर देशात लसीकरणासाठी जाऊ शकतात?

नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वी दुबईच्या एका टूर ऑपरेटरकडून दिल्ली ते मास्को २४ दिवसांच्या टूर पॅकेजचा प्रस्ताव असल्याचे समोर आले होते. ज्यामध्ये रशियाची कोरोना लस Sputnik-V च्या दोन डोसचा देखील समावेश होता. १.३ लाख रूपयांच्या या पर्यटन पॅकेजमध्ये लसीचे दोन डोस आणि संपूर्ण रशियामध्ये २० दिवस दर्शनिय स्थळांची यात्रा याचा देखील समावेश होता. परंतु काही वेळानंतर अरेबियन नाइट्स टूर्स च्या संकेत स्थळावरून हा पॅकेज गायब करण्यात आला.

भारतातून कोणालाही लसीसाठी इतर देशात जाण्याची आवश्यकता नाही : केंद्रीय पर्यटन मंत्रालय

No one from India needs to go to other countries for vaccine: Union Tourism Ministry

हे पॅकेज खूप चांगले दिसत होते, परंतु यापूर्वी काही अडथळे दूर करणे महत्वाचे आहे. ज्यामध्ये भारत ते रशियासाठी व्हिसा आणि उड्डाणे यांचा समावेष आहे. दरम्यान भारतात देखील अनेक पर्यटन संस्था आहेत, ज्या या प्रकारच्या वॅक्सीन टूर पॅकेजवर विचार करीत आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, यावेळी, जरी कोव्हिडच्या दुसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवर अनेक देशांनी भारतातून जाणारी उड्डाणे रद्द केली आहेत, परंतु जेव्हा हवाई प्रवास सुरू होईल त्यावेळी आम्ही अशा प्रकारच्या पॅकेज संदर्भात विचार करू शकतो.

२५ मार्च रोजी पर्यटन सत्र बंद करण्यात आले होते.

केंद्रीय पर्यटन मंत्रालयाचे म्हणणे आहे की, भारतातून कोणालाही लसीसाठी इतर देशात जाण्याची आवश्यकता भासणार नाही. या वर्षाच्या अखेरीस देशातील सर्व लोकांना लस दिली जाईल, आणि ते देखील कमी खर्चात. तथापि, असे असूनही, वॅक्सीन पर्यटन ही संकल्पना भारतात लोकप्रिय होत आहे. एवढेच नाही तर, वॅक्सीन टूरिझम त्या देशांमध्ये देखील लोकप्रिय होत आहे, जेथे लसीचे प्रमाण कमी आहे किंवा ज्या लोकांना विशिष्ट प्रकारचे आजार आहेत आणि त्यांना लस दिली जात नाही.
The Union Ministry of Tourism believes that no one from India will have to go to another country for a vaccine. By the end of this year, all the people of the country will be vaccinated, at least for the price.



‘वॅक्सीन पर्यटन’ गेल्या वर्षापासून ट्रेंडमध्ये आले आहे –

कोरोना काळात मंदीवर मात करण्यासाठी रशिया, अमेरिका देत आहे ‘वॅक्सीन टूरिझम’ची ऑफर!

Social Media