सचिन वाझेला माफीचा साक्षीदार बनवता येणार का? राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा !

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख सध्या शंभर कोटी वसुली प्रकरणी माफीचा साक्षीदार बनवण्यासाठी आरोपी सचिन वाझे  याने ईडीला पत्र लिहिले आहे. मात्र खरोखर सचिन वाझेला माफीचा साक्षीदार बनवता येणार का? याबाबत राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.100 crore recovery case

मुख्य आरोपीला माफीचा साक्षीदार करणे चुकीचा पायंडा

ज्येष्ठ वकील असीम सरोदे यांच्या माहितीनुसार, सीआरपीसी कलम ३०६, ३०७ नुसार माफीचा साक्षीदार करा अशी वाझेची मागणी कायद्यात बसत नाही. कारण मुख्य आरोपी असलेल्या व्यक्तीला माफीचा साक्षीदार करणे चुकीचा पायंडा ठरेल, असे मत असीम सरोदे यांनी व्यक्त केले आहे. शंभर कोटी भ्रष्टाचार प्रकरणातील सगळ्या २५ आरोपींना कायद्यानुसार शिक्षा व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. सचिन वाझेने शंभर कोटी वसुली प्रकरणात माफीचा साक्षीदार बनण्यासाठी ईडीला पत्र लिहिले आहे. वाझे यासंदर्भात १४ फेब्रुवारीला न्यायालयात आपली भूमिका मांडणार आहे. देशमुखांनीही न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे. त्यावर देखील १४ फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे.

Social Media