राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या ‘सक्षम युवा, सशक्त युवा’ या टॅगलाईनचे अनावरण

मुंबई :  केंद्रीय क्रीडा आणि युवक व्यवहार मंत्री अनुराग ठाकूर आणि पुददूचेरीचे नायब राज्यपाल डॉ तामिळीसाई सौंदरराजन 25व्या राष्ट्रीय युवा महोत्सव 2022 च्या लोगो आणि शुभंकर (मॅस्कॉट) चे पुददूचेरी इथे काल अनावरण करण्यात आले. हा युवा महोत्सव पुददूचेरी इथे 12 – 16 जानेवारी 2022 दरम्यान आयोजित करण्यात येईल. पुददूचेरी  विधानसभेचे अध्यक्ष आर सेल्वम, पुददूचेरीचे मुख्यमंत्री एन रंगास्वामी, शिक्षण मंत्री ए नामासिवायाम देखील या प्रसंगी उपस्थित होते.

या प्रसंगी बोलताना अनुराग ठाकूर म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रीय युवा महोत्सव 2022 साठी पुददूचेरीची खास निवड केली आहे. पंतप्रधान या महोत्सवाचं उद्घाटन करतील आणि युवकांना संबोधित करतील, असं अनुराग ठाकूर म्हणाले. अनुराग ठाकूर यांनी राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या ‘सक्षम युवा, सशक्त युवा’ या टॅगलाईनचे देखील अनावरण केले.

सध्या संपूर्ण जगाचे आपल्याकडे लक्ष असून, भारताला एकविसाव्या शतकात अतिशय महत्वाची भूमिका पार पाडायची आहे. युवक ही भारताची शक्ती आहे आणि राष्ट्रबांधणीत त्यांचे अतिशय महत्वाचे योगदान असणार आहे. आपल्या युवाशक्तिला कशी चालना द्यायची यावर आपल्याला अधिक भर द्यायला हवा. जेणेकरुन, भारत जगातील सर्वात भक्कम अर्थव्यवस्था असलेल्या देशांपैकी एक तसेच इतर क्षेत्रातही जागतिक शक्ती बनेल. आता माहिती तंत्रज्ञानापासून ते स्टार्ट अप्स पर्यंत, सगळीकडे भारताची सौम्य शक्ती दाखवण्याची वेळ आली आहे.” असे अनुराग ठाकूर यावेळी म्हणाले.

देशभरातील सर्व युवक, या उत्सवात सहभागी होण्यासाठी पुदुद्दूचेरी इथे येणार आहे. इथे येऊन युवक  अरविंदो यांच्या आयुष्यापासून प्रेरणा घेतील, असं विश्वास ठाकूर यांनी यावेळी व्यक्त केला. अरविंदो,अतिशय श्रेष्ठ दर्जाचे कवी होते, तत्त्वज्ञ होते, मार्गदर्शक तर होतेच; त्याशिवाय एक मोठे योगगुरुही होते. कवि सुब्रह्मण्यम भारती आणि स्वामी विवेकानंद सर्व युवकांसाठी एक आदर्श होते. “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमांमागची संकल्पना, लोकसहभाग ही आहे, म्हणूनच इथल्या स्थानिक लोकांनी, या युवा  उत्सवात, उत्साहाने भाग घ्यावा, अशी आमची इच्छा आहे,” असे अनुराग ठाकूर पुढे म्हणाले. या युवा महोत्सवात होणाऱ्या विविध कार्यक्रमांची सविस्तर माहिती देतांना त्यांनी सांगितले की, हा महोत्सव आपल्याला भारताच्या सांस्कृतिक परंपरांचे दर्शन घडवेल.हा महोत्सव, पुददूचेरीच्या सांस्कृतिक आणि पर्यटनविषयक  क्षमता सिद्ध करण्यास योग्य वाव देणारा असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हा महोत्सव सांस्कृतिक क्षेत्रासाठी पर्वणीच ठरेल तसेच,ईशान्य भारत, हिमालय प्रदेश आणि कच्छसारख्या दुर्गम प्रदेशात राहणाऱ्या युवकांना यामुळे आपली कला कौशल्ये दाखवण्याची संधी मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

त्याआधी, ठाकूर यांनी युवा महोत्सवासाठीच्या तयारीचा सविस्तर आढावा घेतला.

केंद्र सरकार दरवर्षी देशातल्या एका राज्यात, 12 जानेवारी ते 16 जानेवारी दरम्यान, राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन करते. युवा दिन, म्हणजेच स्वामी विवेकानंदांच्या जयंतीपासून या महोत्सवाची सुरुवात होते. राष्ट्रीय युवा महोत्सवाचा मुख्य उद्देश, देशातील युवकांना एकत्र आणून, त्यांची कला तसेच इतर क्षेत्रातील कौशल्ये जगासमोर आणणे हा आहे. या महोत्सवात, मानवी आयुष्यातील जवळपास सर्वच सामाजिक-सांस्कृतिक पैलूंना स्पर्श केला जातो. युवा नवोदित कलाकारांना त्यांची कला सादर करण्याची संधी देणारे हे उत्तम व्यासपीठ आहे.

Union Minister of Youth Affairs and Sports, Shri Anurag Thakur and Lt. Governor of Puducherry Dr. Tamilisai Soundararajan today unveiled the Logo and Mascot of the 25th National Youth Festival to be held in Puducherry from 12th -16th January 2022.  Speaker of the Puducherrry Legislative Assembly,Shri R. Selvam, Chief Minister of Puducherry Shri N. Rangaswamy, Education Minister Shri A. Namasivayam were also present on the occasion.

Social Media