मुंबई : कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव रोखण्याकरीता महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहिम हाती घेण्यात आलेली आहे. परंतु राज्य सरकारने सध्या लावलेल्या कठोर निर्बंधांमुळे सर्वसामान्यांना लसीकरण (vaccination)केंद्रावर जाऊन लस घेण्यास अडचणी येत आहेत. या सर्व अडचणी दूर करून ‘घरोघरी जाऊन कोरोना प्रतिबंधक लस देण्याची मोहिम’ राज्य सरकारने हाती घ्यावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले(Nana Patole) यांनी मुख्यमंत्र्याना पत्र पाठवून केली आहे.
लस घेणे लोकांसाठी जिकिरीचे(Getting vaccinated is a jikiri for people)
ग्रामीण भागात लसीकरण केंद्रे संख्येने कमी व दूर अंतरावर असल्याने प्रवास करून केंद्रावर जाऊन लस घेणे लोकांसाठी जिकिरीचे ठरत आहे. १ मे नंतर तर १८ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण केले जाणार आहे. त्यावेळी लसीकरण केंद्रावरील गर्दी वाढून संसर्ग वाढण्याचा धोका जास्त आहे. लसीकरणातील या सर्व अडचणी दूर करून ‘घरोघरी जाऊन कोरोना प्रतिबंधक लस देण्याची मोहिम’ राज्य सरकारने हाती घ्यावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले(Nana Patole) यांनी केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र(Letter to CHIEF Minister Uddhav Thackeray)
पटोले यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, अमेरिका, ब्रिटनसह इतर देशानेही लसीकरण मोहिम मोठ्या प्रमाणावर राबविल्याने कोरोनाची रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे. महाराष्ट्रानेही देशात लसीकरणात मोठी आघाडी घेऊन १ कोटीपेक्षा जास्त लसीकरण केले आहे. ही लसीकरण मोहिम राबवण्यासाठी मनुष्यबळही मोठ्या प्रमाणात लागणार आहे हे लक्षात घेऊन सरकारी यंत्रणेबरोबरच, खाजगी रुग्णालयातील कर्मचारी वर्ग, स्वयंसेवी संस्था-संघटनांची मदत घेता येईल.
अर्थचक्र सुरुळीत चालण्यात अडथळे (Obstacles to walking in the earth cycle start)
रुग्णालयात बेड्स मिळत नाहीत, रेमडेसीवीर, ऑक्सीजनअभावी दररोज लोकांचे जीव जात आहेत हे भयानक चित्र पहावत नाही. एकीकडे जीवितहानी होत असताना अर्थचक्रही सुरुळीत चालण्यात अडथळे येत आहेत. कोरोनामुळे वर्षभरात सर्वच क्षेत्राला मोठा फटका बसलेला आहे. या संकटावर मात करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लसीकरण करावे ही काँग्रेस पक्षाची पहिल्यापासूनची आग्रही मागणी राहिली आहे. काँग्रेसच्या मागणीचा विचार करून आपण योग्य तो निर्णय घ्यावा, असे नाना पटोले(Nana Patole) म्हणाले.
A massive vaccination drive has also been undertaken in Maharashtra to check the growing prevalence of corona. But the stringent restrictions imposed by the state government at present are making it difficult for the common man to go to the vaccination centre and get the vaccine. Maharashtra Pradesh Congress Committee Chairman Nana Patole has sent a letter to the Chief Minister demanding that the state government take up a ‘door-to-door corona vaccine vaccine campaign’ to remove all these problems.