फायझर आणि मॉडर्नाच्या वॅक्सीनमुळे हृदयाला सूज, जाणून घ्या याची लक्षणे…..

जिनेव्हा : जागतिक आरोग्य संस्थेने (डब्ल्यूएचओ) म्हटले आहे की, फायझर आणि मॉडर्नाची एमआरएनए आधारित कोरोना वॅक्सीन(mRNA Covid-19 vaccines) घेतल्यानंतर हृदयात सूज येण्याची दुर्मीळ प्रकरणे आढळून आली आहेत, परंतु या लसीमुळे होणाऱ्या फायद्यांच्या तुलनेत ही प्रकरणे नगण्य आहेत. मायोकार्डिटिस किंवा पेरिकार्डिटिस च्या लक्षणांमध्ये सतत छातीत दुखणे आणि श्वास घेण्यास समस्या येणे यांचा समावेश आहे.

डब्ल्यूएचओच्या लस सुरक्षिततेवर जागतिक सल्लागार समितीने सांगितले आहे की, मायोकार्डिटिस(myocarditis) आणि पेरिकार्डिटिस (pericarditis) ची काही प्रकरणे अमेरिका आणि इतर देशांमध्ये आढळून आली आहेत. मायोकार्डिटिस म्हणजे हृदयाच्या स्नायूंना सूज येणे, तर पेरिकार्डिटिस म्हणजे हृदयाच्या सभोवतालच्या थराला सूज येणे होय. मिळालेल्या आकडेवारीनुसार असेही दिसून येते की, लसीकरणानंतर मायोकार्डिटिस (myocarditis) आणि पेरिकार्डिटिसचे त्वरित कारण सामान्यतः सौम्य असते.

Blood Sugar नियंत्रित करण्यासाठी करा ‘या’ पदार्थांचे सेवन…. –

समितीने सांगितले की, एमआरएनए कोरोना वॅक्सीन घेतल्यानंतर तरूणांमध्ये हृदयाला सूज येण्याची काही प्रकरणे आढळून आली आहेत. तसेच दुसरा डोस घेतल्यानंतर काही दिवसांनी अशा प्रकारची प्रकरणे समोर आली आहेत. ही सूज खूपच सौम्य होती आणि बहुतांश लोकांना विश्रांती घेऊनच आराम मिळाला.

कोरोनाचा मुलांच्या तुलनेत मुलींवर अधिक प्रभाव : अभ्यास – 

यूएस वॅक्सीन एडव्हर्स एव्हेट्स रिपोर्टिंग सिस्टिमच्या (VAERS)आकडेवारीनुसार, ११ जून, २०२१ पर्यंत १२ ते २९ वर्ष वयोगटातील लोकांपैकी पुरूषांमध्ये दुसऱ्या डोसनंतर मायोकार्डिटिसची १० लाखांपैकी सुमारे ४०.६ प्रकरणे तर महिलांमध्ये १० लाखांपैकी ४.२ प्रकरणे समोर आली आहेत, ज्यांना एमआरएनए कोव्हिड-१९ लस देण्यात आली होती.

जॉन्सन एँड जॉन्सनची वॅक्सीन डेल्टासह इतर कोरोना व्हेरिएंटविरूद्ध प्रभावी : कंपनीचा दावा – 

तर, या दुर्मीळ प्रकरणाची पुष्टी यूरोपच्या ड्रग रेगुलेटर, यूरोपियन मेडिसिन संस्थेने देखील केली होती. ईएमएच्या फार्माकोव्हिलेन्स जोखीम मूल्यांकन समितीने यूरोपमध्ये मायोकार्डिटिस आणि एमआरएनए लसी दरम्यान संबंध असल्याची पुष्टी केली. जागतिक आरोग्य मंडळाने डॉक्टरांना एमआरएनए लसीबरोबरच मायोकार्डिटिस आणि पेरीकार्डिटिसच्या जोखमेबद्दल जागरूक राहण्याचा सल्ला देखील दिला आहे.
Cases of inflammation in the heart were found due to Pfizer, Moderna vaccine, know what are its symptoms?


केरळमध्ये झिका विषाणूचा प्रादुर्भाव, १४ प्रकरणांनंतर हाय अलर्ट जारी… –

केरळमध्ये झिका विषाणूचा प्रादुर्भाव, १४ प्रकरणांनंतर हाय अलर्ट जारी…

ज्या लोकांचे पूर्णपणे लसीकरण झाले आहे त्यांना सध्या बूस्टर डोसची (Booster Dose)आवश्यकता नाही –

फायझरच्या कोव्हिड बूस्टर डोसच्या परवानगीवर, FDA आणि CDC कडून मिळाला असा प्रतिसाद!

Social Media