ऋषिकेशमधील आयडीपीएल विशेष पर्यटन क्षेत्राला केंद्राची मंजुरी!

देहरादून : ऋषिकेशमधील ‘आयडीपीएल’(IDPL)ला विशेष पर्यटन क्षेत्र (Special Tourism Zone)म्हणून विकसित करणाच्या राज्य सरकारच्या योजनेला केंद्राने हिरवा झेंडा दाखवला आहे. मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी दिल्लीमध्ये केंद्रीय पर्यटन(Tourism) तसेच संस्कृती राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) प्रल्हाद सिंह पटेल यांच्यासमवेत झालेल्या बैठकीदरम्यान यासंबंधी विनंती केली, ज्यावर केंद्रीयमंत्र्यांनी या योजनेला मंजुरी दिली. योजनेअंतर्गत आयडीपीएल मध्ये ६०० एकर जागेमध्ये बायोडायव्हर्सिटी पार्क, आंतरराष्ट्रीय अधिवेशन केंद्र, रिसॉर्ट, हॉटेल, वेलनेस सेंटर उभारण्याचा प्रस्ताव आहे. केंद्रीयमंत्र्यांनी या योजनेचे कौतुक करत हे इतर राज्यांसाठी अनुकरणीय असल्याचे म्हटले आहे. याशिवाय त्यांनी पुढे सांगितले की, पुढे जाऊन केंद्र सरकार यासाठी आर्थिक मदत देखील करेल. मुख्यमंत्र्यांच्या विनंतीवरून केंद्रीय पर्यटन राज्यमंत्र्यांनी नमामि गंगेच्या अर्थ गंगा कार्यक्रमात ऋषिकेशचा(Rishikesh) समावेश करण्याची शिफारस देखील केली.

मुख्यमंत्र्यानी संभाषणादरम्यान केंद्राच्या प्रसाद योजनेचा उल्लेख करताना म्हटले की, गंगोत्री आणि यमुनोत्री धाममधील प्रवाशांच्या सुविधांमध्ये वाढ होण्याच्या दृष्टीने एक सविस्तर अहवाल केंद्राकडे पाठविण्यात आला आहे. त्यांनी यास लवकर मंजुरी मिळावी अशी विनंती केली आहे. यावर केंद्रीय मंत्र्यांनी आश्वासन दिले आहे की पुढील आठवड्यापर्यंत प्रसाद योजनेत ५० कोटी रूपयांची मंजुरी दिली जाईल.
Center gives green signal to IDPL Special Tourism Zone, they will be established under the scheme.


ताजनगरीच्या पर्यटन संस्थांनी १६ जूनपासून स्मारके उघडण्याच्या निर्णयाचे केले कौतुक! –

देशभरातील स्मारकांना लागलेले कुलूप दोन महिन्यांच्या अवधीनंतर उघडणार…

Social Media