नवी दिल्ली : 2 एप्रिलपासून चैत्र नवरात्रीला सुरुवात झाली आहे. यादरम्यान देशातील प्रसिद्ध देवी मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी असते. देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक मातेच्या प्रसिद्ध मंदिरांमध्ये पूजेसाठी येत आहेत. चैत्र नवरात्र (Chaitra Navratri)11 एप्रिल पर्यंत असून या काळात दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते आणि त्यांच्याकडून वरदान मागितले जाते.
नवरात्रीमध्ये कलश स्थापनेला विशेष महत्त्व आहे. शुभ मुहूर्तावर भक्त आपल्या घरी कलशाची स्थापना करतात आणि त्यानंतर माँ जगदंबेची पूजा करतात. या नवरात्रीत, देवीचा विशेष आशीर्वाद मिळविण्यासाठी तुम्ही देशभरातील काही प्रसिद्ध मंदिरांमध्ये दर्शनासाठी आणि प्रार्थना करण्यासाठी जाऊ शकता.
कामाख्या मंदिर(Kamakhya Temple)
आसाममधील(Assam) निलाचल टेकडीच्या (Nilchal Hill)शिखरावर कामाख्या मंदिर(Kamakhya Temple) आहे. या मंदिरात देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक मातेच्या पूजेसाठी आणि दर्शनासाठी येतात. इथे देवीची मूर्ती नाही. कामाख्या मंदिरात योनीची पूजा केली जाते. हे मंदिर 108 शक्तीपीठांपैकी एक प्राचीन मंदिर आहे. ज्याचा उगम ८व्या शतकात झाला. 16 व्या शतकात कूचबिहारचा राजा नर नारायण याने त्याची पुनर्बांधणी केली. तेव्हापासून ते अनेक वेळा पुन्हा बांधले गेले.
नैना देवी(Naina Devi)
नैना देवी मंदिर उत्तराखंडच्या(Uttarakhand) मल्लीतालच्या नयनरम्य खोऱ्यात वसलेले आहे. एकेकाळी अत्रि, पुलस्त्य आणि पुलह या ऋषींचे पूजास्थान होते असे म्हणतात. नवरात्रीच्या शुभमुहूर्तावर दूरदूरवरून भाविक नयना देवी मंदिरात येतात आणि देवीचे दर्शन घेवून विशेष प्रार्थना करतात.
ज्वाला देवी (Jwala Devi)
ज्वाला देवी हिमाचल प्रदेशातील(Himachal Pradesh) कांगडा(kangda) येथे आहे. हे मातेचे सिद्धपीठ मंदिर असून येथे देशभरातून भाविक दर्शनासाठी येतात. ज्वालादेवीमध्ये देवी सतीची जीभ पडली होती आणि या ठिकाणी अनादी काळापासून पृथ्वीच्या आतून अनेक अग्नी निघत आहेत. ही आग कधीच विझत नाही. या नवरात्रीत तुम्ही ज्वालादेवीचा आशीर्वाद घेण्यासाठी या मंदिरालाही भेट देऊ शकता.
मनसा देवी(Mansa Devi)
मनसादेवी मंदिर हरिद्वारच्या (Haridwar)सर्वोच्च शिखरावर आहे. हे मातेचे परिपूर्ण आणि चमत्कारी मंदिर आहे. एका कोपऱ्यावर नीलपर्वतावर भगवतीदेवी चंडी, दुसऱ्या बाजूला दक्षेश्वर स्थानाची पार्वती आणि तिसर्या बाजूला बिल्वपर्वतवासिनी मनसादेवी विराजमान आहेत. नवरात्रीला येथे विशेष पूजा केली जाते आणि दूरदूरवरून भाविक मातेच्या दर्शनासाठी येतात.
कालीपीठ(Kalipeeth)
कोलकात्यात कालीघाट(Kalighat) येथे काली देवीचे प्रसिद्ध मंदिर आहे. रामकृष्ण परहंस (Ramakrishna Parhansa)या कालीची पूजा करत असत. नवरात्रीत या मंदिरात दूरदूरहून भाविक पूजेसाठी येतात.
Electrification of Indian Railways: डिझेलच्या वाढत्या किमतींमध्ये रेल्वेचे 100% विद्युतीकरण
ताडोबा हे सर्वोत्तम ठिकाण व्हावे यासाठी एकात्मिक पर्यटन आराखडा सादर करावा : मुख्यमंत्री