राज्यातील शाळा (school)संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे सरकारने राज्यातील प्राथमिक शाळांच्या वेळेत बदल(Changes in primary school timings) करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांनी पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथी पर्यंतचे वर्ग आता सकाळी 9 किंवा 9 वाजेनंतर भरवण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.
याबाबत शासन परिपत्रकही जाहीर करण्यात आलं आहे. राज्यपाल रमेश बैस यांनी शालेय शिक्षण विभागाला सकाळच्या सत्रातील शाळांच्या वेळेबाबत विचार करण्याबाबत सूचना केली होती.
त्यानंतर मंत्री दीपक केसरकर(Deepak Kesarkar) यांच्या निर्देशानुसार राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत राज्यातील विविध शाळांच्या वेळा विचारात घेऊन शाळांची वेळ बदलण्याविषयी अभ्यास करण्यात आला आहे. त्यामुळे आता सन 2024-25 या शैक्षणिक वर्षापासून हा निर्णय लागू होणार आहे.