मुंबई : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj)यांचा महाराष्ट्रातील सर्वात उंच अशा पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण गुरुवार दिनांक ३ ऑक्टोबर २०२४ रोजी सायंकाळी ४ वाजता श्री धाविर महाराजांच्या रोहा(Roha) नगरीत होणार आहे.
भव्य मिरवणूकीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती व महाराष्ट्रातील सर्वात उंच पुतळ्याचे अनावरण कुंडलिका नदी(Kundalika River) संवर्धन रोहा येथे केले जाणार आहे.
रोहा अष्टमी नगर परिषदेच्या माध्यमातून होणार्या या भव्य सोहळ्याला खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, युवराज संभाजीराजे छत्रपती, सरखेल कान्होजी आंग्रे यांचे वंशज सरखेल रघुजीराजे आंग्रे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनिल तटकरे, उद्योगमंत्री उदय सामंत, महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे, आमदार अनिकेत तटकरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.