अभिनेता विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार
मुंबई : बहुचर्चित छावा चित्रपट १४ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. अभिनेता विकी कौशल(VickyKaushal) छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार असून चित्रपटाचा ट्रेलर २२ तारखेला प्रदर्शित होतोय!
अग्नि भी वो, पाणी भी वो, तुफान भी वो, शेर शिवा छावा है वो! असं म्हणत ‘मॅडॉक फिम्स’ने ‘छावा’ या सिनेमामधली अभिनेता विकी कौशलचा टिझर प्रदर्शित करत त्यांचा लूक रिव्हील केला.
छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्यभिषेक दिनाचे औचित्य साधून चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले. अभिनेता विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत सिंहासनावर बसलेला या पोस्टर मध्ये पाहायला मिळतो आहे.या पोस्टरने चाहत्यांच लक्ष वेधून घेतलं असून, प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहतायत
छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याचा धगधगता इतिहास या चित्रपटातून मांडण्यात येणार आहे.अभिनेता विकी कौशल बरोबर , रश्मिका मंदान्ना, अक्षय खन्ना यांचा देखील अभिनय प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
या आधीही छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित अनेक चित्रपटांची निर्मिती करण्यात आली होती, मात्र संपूर्ण भारतभर मोठ्या पातळीवर संभाजी महाराजांची कथा मांडण्यात दिग्दर्शक – निर्मात्यांना यश आलं नव्हतं मात्र ‘छावा’ चित्रपटाच्या टिजरला मिळालेल्या भव्य प्रतिसादामुळे हा चित्रपट मनोरंजनाच्या सर्व पातळीवर गाजण्याची शक्यता वर्तवली जातेय!
या चित्रपटाची निर्मिती मॅडॉक फिल्म्सने केली असून, लक्ष्मण उतेकर यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे!