कुटूंबिय आणि कार्यकर्त्यासह मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री रंगले होळीच्या रंगात!

मुंबई : राज्यात मोठ्या उत्साहात होळी(holi) आणि धुळवडीचा सण पारंपारीक पध्दतीने साजरा करण्यात आला.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Chief Minister Eknath Shinde) यांनी ठाण्यात त्यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यासह दोन वर्षाचा नातू रूद्रांशसह होळीच्या रंगाचा आनंद घेतला. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यानी नैसर्गिक रंगानी होळी खेळण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, दरवर्षी प्रमाणेच यंदा देखील साजरी करत आहे आमच्या सरकार आल्यानंतर लोकांनी मुक्तपणे सर्वच सणांचा आनंद उत्साहात साजरे केले आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानी देखील मुंबईत भाजप मुंबईच्या उत्तर भारतीय मोर्चाने जुहू येथे आयोजित केलेल्या होळीच्या सणात भाग घेतला. त्यावेळी माजी मंत्री कृपाशंकर सिंग, खा मनोज तिवारी मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार मंत्री मंगलप्रभात लोढा उपस्थित होते. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भंग के साथ नही रंग के साथ जीवन रंगीन बनेऐसी शूभकामना देता हू.  फडणवीस यांनी पत्रकारांच्या प्रश्नाना टाळण्याचा प्रयत्न केला. मात्र काही प्रश्नाची उत्तरे देताना संजय राऊत (Sanjay Raut)आणि उध्दव ठाकरे(Uddhav Thackeray) यांच्या बाबतच्या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले की राज्यात काही लोक वर्षभर आमच्या पक्षाच्या आणि सरकारच्या नावाने शिमगा करत असतात, त्यांना आजच्या होळीच्या दिवशी मला इतकेच आवाहन करावेसे वाट ते की त्यानी वर्षभर सभ्यपणाने वागले तर त्यांना देखील होळीच्या आणि शिमग्याच्या सणाचा वर्षातून एकदा असा आनंद घेता येइल.

होळीच्या सणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी ठाण्यात पोहचल्यावर हट्ट करणा-या नातू रूद्रांश सह होळीला चक्क दुकानात जाऊन चेंडू घेऊन दिला. मुख्यमंत्री शिंदे ज्या किसननगरमध्ये लहानाचे मोठे झाले तिथे होळीच्या निमित्ताने गेले त्यावेळेस त्यांच्या सोबत त्यांचा नातू रुंद्राश होता. होळी दहन झाल्यानंतर रुंद्राशने आजोबांकडे दुकानातून चेंडू घेऊन द्या असा हट्ट धरला. त्याचा हट्ट पुरविण्यासाठी मग मुख्यमंत्री आजोबा त्याला दुकानात घेऊन गेले. त्यावेळी अचानक दुकानात राज्याचे मुख्यमंत्री आल्याचे पाहून दुकानदारही भारावून गेला. मुख्यमंत्री शिंद यांनी नातवाला चेंडू घेवून दिला. तितक्यात तिथे खासदार श्रीकांत शिंदेही पोहोचले. त्यांनी स्वतःच्या खिशातून पैसे काढून दुकानदाराला देत आपल्या मुलाचा हट्ठ पुरविला!

Social Media