कोण काय म्हणते त्यात जायचे नाही मात्र शेतक-यांच्या मागे सरकार ठामपणे उभे आहे : एकनाथ शिंदे 

मुंबई  : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी वर्षा निवास स्थानी शेतकरी आणि शेती उद्योगांशी संबंधितांसोबत दिवाळी सण साजरा केला. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, कोण काय म्हणते त्यात जायचे नाही मात्र शेतक-यांच्या मागे सरकार ठामपणे उभे आहे, सध्या जे काही नुकसान झाले आहे त्याची भरपाई देण्याचा निर्णय झाला असून मागील दोन महिन्यांपासून होणा-या अतिवृष्टीच्या नुकसानीसाठी सरकारने चारशे कोटी पेक्षा जास्त निधी वितरीत केला आहे. तर अजूनही मदत केली जात आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde), यांच्यासह यावेळी कृषीमंत्री अब्दुल सत्तार, भाजप नेत प्रविण दरेकर अमरावतीचे माजी खासदार आनंदराव अडसूळ उपस्थित होते. यावळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की राज्यात सरकार बदल ल्या नंतर वातावरण बद ल ले असून सारे सण जनतेला आनंदाने सांजरे करता आले आहेत. लोकांच्या जौवनात नव्या विकासाच्या योजनांमुळे बदल घडविण्याचे काम सरकार करत असून शेतकरी हा त्याचा केंद्रबिंदू आहे. अगदी आषाढीच्या विठ्ठलाच्या पुजेतही आपण बळीराजा सुरखी होवू दे हेच मागणे विठ्ठलाकडे मागितले, त्यामुळे या सरकारकडून शेतक-यांच्या विभागवार मेळाव्यासह समस्या जाणून घेत त्या भविष्यात सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल असे ते म्हणाले. आज दिवाळी उत्साहाने साजरी करा आणि सरकार सामान्य शेतक-यांचे असल्याने तुमच्या सा-या समस्या आपण दूर करू हा विश्वास बाळगा असे सांगत मुख्यमंत्री म्हणाले की मी आज कुणी काय म्हणाले त्यात जाणार नाही, मात्र नवे सरकार आल्याबर झालेला कामातील बदल लोकांना समजला आहे असे त्यांनी ठाकरे सरकारचा उल्लेख टाळून सांगितले.

Social Media