‘आपलं सरकार, लाडकं सरकार’; विधानसभा निवडणुकीआधी मुख्यमंत्र्यांकडून  नवी घोषणा! 

पोहरादेवी  (वाशिम)    :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Chief Minister Eknath Shinde) यांनी पोहरादेवीतील(Pohradevi) सभेला संबोधित करताना  सरकारने केलेल्या कामाचा  लेखाजोखा मांडला. लाडकी बहीण योजनेमुळे महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम केले. महिलांच्या खात्यात तीन टप्प्यातील साडे चार हजार जमा झाले आहेत. कुणी माईचा लाल लाडकी बहिण योजना बंद करू शकत नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. तसंच आपलं सरकार आता लाडकं सरकार झाले आहे, असेही एकनाथ शिंदें म्हणाले.
लाडकी बहीण योजना सुपरहिट ठरली आहे. आमच्या बहिणींच्या खात्यात लाडकी बहिण योजनेचे पैसे जमा झाले आहेत. विरोधक म्हणतात की आम्ही ही योजना बंद करू. पण आज मी इथं सांगू इच्छितो की कुणीही ही योजना बंद करू शकत नाही. आमचं सरकार सर्व वर्गातील लोकांना न्याय देण्याचं काम करत आहे. त्यामुळे ‘आपलं सरकार, लाडकं सरकार’ झालेलं आहे, असे शिंदें म्हणाले.
आजच्या या कार्यक्रमासाठी बंजारा समाज एकत्र आला आहे. ‘बंजारा विरासत’चं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या(Narendra Modi) हस्ते लोकार्पण झालेलं आहे. सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा, असा हा दिवस आहे. हा आपल्या सगळ्यांसाठी आनंदाचा आणि अभिमानाचा दिवस आहे. आज ‘बंजारा विरासत’चं लोकार्पण झालं. यात बंजारा समाजाचा इतिहास आणि परंपरा दाखवण्यात आली आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
रामराव महाराजांनी इच्छा व्यक्त केली होती, की आदरणीय पंतप्रधानांनी पोहरादेवीला(Pohradevi) यावं. पण तो इतर कुणाच्या नशिबात योग आला नाही. आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नशिबात तो योग होता. मोदीजी इथं आले आणि त्यांच्या हस्ते ‘बंजारा विरासत’चं लोकार्पण झालं, असे एकनाथ शिंदें म्हणाले.
संत सेवालाल महाराजांनी बंजारा(Banjara) समाजाला जगण्याचा अधिकार दिला. बंजारा(Banjara) समाजाने त्यांची संस्कृती, त्यांची वेशभूषा आजही सांभाळलेली आहे. या समाजाचा इतिहास जपण्याचं काम आपल्याला करायचं आहे. किड्या मुंग्यांचं रक्षण करा. पर्यावरणाचं रक्षण करा. कोणताही भेदभाव करू नका, असं बंजारा समाज सांगतो, असे शिंदेंनी यावेळी सांगितले.
Social Media