मला उत्तरे देण्याऐवजी देशातील जनतेला वाढलेल्या महागाईवर द्या, या गर्दीला द्या : पक्षप्रमुख उध्दव ठाकरेचे भाजपला सवाल!

मुंबई  : केंद्रीय यंत्रणाच्या आडून मागे लागाल तर मेलेल्या आईचे दूध आम्ही प्यायलो नाही असा इशारा देत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray)यांनी विरोधकांना आव्हान दिले. उद्या मला उत्तरे देण्याऐवजी देशातील जनतेला वाढलेल्या महागाइवर द्या या गर्दीला द्या असे सांगत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी भाजपला सवाल केला की, भगव्या टोपीत हिंदुत्व असेल तर रास्वसंघाची टोपी काळी का? आमचे हिंदुत्व तुम्ही ठरवू शकत नाही. शिवरायांचा पवित्र महाराष्ट्र बदनाम करू नका. सुसंस्कृतपणे समोर या आपण हा महाराष्ट्र पुढे घेवून जावूया असे आवाहन त्यांनी केले.  मुन्नाभाई एमबीबीस सारखे काही लोकांना आपणच बाळासाहेब झाल्यासारखे वाटते तसे काहीना वाटते मात्र शेवटी त्यांना केमिकल लोच्या झाल्याचे समजते अशी टिका त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे(Raj Thackeray) नाव न घेता केली.

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या सभेपूर्वी कर्जमुक्ती झालेल्या सातबारा कोरा घेवून आलेल्या शेतक-यांनी त्यांचे स्वागत केले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांनी सांगितले मला घंटा बडवणारा हिंदू नको अतिरेक्यांना बडवणारा हिंदू हवा आहे असे सांगितले असे ते म्हणाले. ते म्हणाले की फडणवीसांनी आम्हाला गदाधारी म्हटले हो आम्ही पूर्वी गधाधारी होतो पण त्या गाढवाने लाथ मारण्यापूर्वी आम्हीच त्याला लाथ मारून हाकलून दिले असे ते म्हणाले. मुख्यमंत्री म्हणाले की फडणवीसांनी मुंबई मुक्त करण्याची त्यांच्या मालकांची ईच्छा व्यक्त केली. पण मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळी करण्याची हिंमत तुमच्या बापालाही करता आली नाही असे ते म्हणाले. ते म्हणाले की, देशाच्या आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात माझे आजोबा वडील आणि काकाही होते. पण भाजपच्या मातृसंस्था जनसंघाने काय केले याचा इतिहास तपासून पहा असे ते म्हणाले.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की हिंदुत्व आमचा श्वास आणि मराठी आमचा प्राण आहे हे सांगण्याची गरज नाही. पण आज प्रश्न आहे तो महागईचा आहे. पंतप्रधानानी सभेत कर कमी करण्याबाबत केलेल्या वक्तव्याचात्यांनी समाचार घेतला. आम्ही मुंबईला ओरबाडले नाही असे सांगत ते म्हणाले की तुम्हाला मुंबई ओरबाडण्यासाठी हवी आहे. देशात सात पैसे इंधनाचे दर वाढले तर वाजपेयींच्या नेतृत्वात बैलगाडी मोर्चा काढणारा भाजप कुठे गेला आहे.

रामभाऊ म्हाळगी प्रवोधिनीत सध्या चिंतन चालते की कुंथन चालते? असा सवाल त्यांनी केला. तेथे दिलेले संस्कार कुठे गेले, असा सवाल करत त्यांनी खोटे बोलायला आपल्या हिंदुत्वात शिकवले जात नाही असे सांगितले. देशाच्या अमृत महोत्सवी वर्षात रूपयांचे अवमुल्यन होत त्याचे मुल्य ७५ रूपयांच्या वर गेले याची लाज लज्जा नाही असे ते म्हणाले. यांचे काय सुरू आहे बी टिम सी टिमच्या हातून कारवाया केल्या जात आहेत म्हणजे ऊद्या कारवाई झाली तर हे नामानिराळे राहतात. काश्मिर पंडिताना संरक्षण न देता या टिनपाटांना संरक्षण का दिले जात आहेअसा सवाल त्यांनी केला.

सत्ता असो किंवा नसो आमचे हिंदुत्व कच्चे नाही असे ते म्हणाले. आमचे नेतृत्व सोडण्याचे आणि नेसण्याचे वस्त्र नाही. तुम्ही मेहबुबासोबत गेलात तर ते पवित्र आम्ही राष्ट्रवादीसोबत गेलो तर हिंदुत्व सोडले मग तुम्ही पहाटे गेलात तेंव्हा काय सोडले होते असे सवाल त्यांनी भाजपला केले. संघावर टिका करणा-या नितीश कुमारांसोबत भाजप सत्तेत राहतो ते कसे चालते असा नेहमीचा सवालही त्यांनी केला. पाकिस्तानचे आव्हान स्विकारत मेहबुबाचे सरकार स्थापन केले तर त्यावेळच्या त्या सरकारच्या मंत्र्याची वक्तव्ये काढून बघा असे ते म्हणाले.
आयोध्येला गेल्याचा दावा करणारे फडणवीस सहलीला गेले होते का? त्यांनी चढायचा प्रयत्न केला असता तरी त्यांच्या वजनाने तो ढाचा पडला  असता अशी खिल्ली त्यांनी उडवली. बाबरी पाडल्यानंतरच्या बाळासाहेबांच्या वक्तव्यासह लालकृष्ण आडवाणीच्या मुलाखतीचा संदर्भ त्यांनी दिला. उद्या उत्तरे देण्याऐवजी देशातील जनतेला वाढलेल्या महागाइवर द्या या गर्दीला द्या असे ते म्हणाले. भगव्या टोपीत हिंदुत्व असेल तर रास्वसंघाची टोपी काळी का? असा सवाल त्यांनी केला. आमचे हिंदुत्व तुम्ही ठरवू शकत नाही. बाळासाहेबांनी विचार दिला त्याचा तुम्ही विकार केला आहे. केतकी चितळेप्रकरणाचाही त्यांनी समाचार घेतला हे संस्कार हिंदूत्वाचे नाही असे ते म्हणाले. विकृती टाळा सांगणारे आज कुणी राहिले नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

मुंबई वेगळी करणारांना आपण मुंबईचा कसा चौफेर विकास करत आहोत ते सांगायला हवे असे सांगत त्यांनी महापालिका शाळांचा उल्लेख केला. कोविडमध्ये ऐवढ्या मोठ्या प्रमाणात राज्याने काम केले. सध्या भाजपचे लोक दाऊदच्या मागे लागलेत पण तो भाजपात येतो म्हणाला तर त्याला मंत्री बनवतील अशी टिकाही त्यांनी केली. हनुमानाचे नाव घेण्याची पात्रता नसणारे लोक त्यांचे नाव घेत आहेत असे ते म्हणाले. आम्ही शिवभोजन थाळ्या दहा कोटीवर गेली आहे तुमच्या रिकाम्या थाळ्या वाजविणयाचा कार्यक्रम महागाईसाठी का वाजवत नाही असा सवाल त्यांनी केला. स्टार्टअपसाठी राज्य प्रथम क्रमांकावर आहे. म्हणून ते बदनामीचा प्रयत्न करत आहेत. आदित्य तिरुपतीला जावून आला आता आयोध्येलाही जाणार असे सांगत त्यांनी आम्ही यापूर्वी अनेकदा जावून आलो असे सांगितले. छत्रपतींच्या मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून तुमचा भोंगा लावून का जात नाही असा सवाल त्यांनी विरोधकांना केला.

यावेळी उध्दव ठाकरे यांनी जावेद मियादांदचा किस्सा सांगत बोबडे बोलून दाखवत मिमिक्री देखील केली. सत्तेची अडीच वर्ष झाली पिकलेले आंबे पडले पण सरकार पडले नाही. केंद्रीय यंत्रणाच्या आडून मागे लागाल तर मेलेल्या आईचे दूध आम्ही प्यायलो नाही असा इशारा त्यांनी शेवटी दिला. महाराष्ट्रातील जनतेला धन्यवाद देताना त्यांनी राज्य पेटविणा-यांना महत्व दिले नाही म्हणून आभार व्यक्त केले. ही सभा नाही हिंदुत्वाचा उत्सव आहे हिंदू महासागर अहे असे ते म्हणाले.

या सभेला मातोश्री बाहेर पहारा देणा-या शिंदे आजी देखील आवर्जून हजर होत्या. त्यांना माध्यमांनी राज ठाकरे शिवसेना सोडून गेल्याबाबत विचारले असता त्यानी सांगितले की उध्दव साहेबांना भावाने सोडून जाणे पटले नसल्याचे सांगितले. त्या म्हणाल्या बाळासाहेबांच्या विचाराला आम्ही कधी सोडले नाही आणि साहेबांनाही सोडणार नाही.

Social Media