मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रकृती अस्वास्थाबाबत रुग्णालयात दाखल करावे लागण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांना पाठीचा मणका आणि मानेच्या स्नायूंच्या दुखपतीचा त्रास बळावला आहे. गेल्या आठवड्यापासून त्यांना हा त्रास होत आहे. मागील अनेक दिवसांपासून हा त्रास जाणवत असल्यामुळे ठाकरे यांनी भेटीगाठी टाळल्या आहेत.
मणका आणि मानेच्या स्नायूंचा त्रास
त्यांनी दिवाळी निमित्त वर्षा बंगल्यावर पाहुण्यांकडून शुभेच्छा घेणे देखील टाळले होते. त्यामुळे पुढील उपचारासाठी मुख्यमंत्र्यांना काही दिवस रुग्णालयात दाखल व्हावे लागण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांना मागील काही दिवसांपासून मणका आणि मानेच्या स्नायूंचा त्रास होत आहे. त्यासाठी त्यांनी गेल्या सोमवारी गिरगावातील सर एच. एन. रिलायन्स हॉस्पिटलमध्ये आरोग्य तपासणी केली होती. तसेच यावेळी त्यांनी काही शारीरिक चाचण्या केल्या होत्या.