नवी दिल्ली : देशात कोरोना विषाणूची दुसरी लाट ( Second wave of coronavirus ) यावेळी हाहाकार माजवत आहे, यासोबतच ब्लॅक फंगस ( Black fungus ) सारख्या आजारांनी लोकांची चिंता अधिकच वाढविली आहे. या दरम्यान महाराष्ट्र सरकारने कोव्हिड आणि काळी बुरशी यासारख्या संसर्गावर मात करण्यासाठी रणनीती आखण्यास सुरूवात देखील केली आहे.
महाराष्ट्रात ( Government of Maharashtra ) बालरोगतज्ञ आणि कोरोना टास्क फोर्स ने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे अवाहन केले आहे की, पावसाळ्यापूर्वी लहान मुलांना तापावरची (फ्लू) लस देण्यात यावी. डॉक्टरांच्या मते कोरोना आणि ताप येण्याची (फ्लू) सुरूवातीची लक्षणे जवळपास सारखीच आहेत. अशा परिस्थितीत असे म्हटले जात आहे की फ्लूच्या उपचाराद्वारे कोरोनाचा संभाव्य धोका टाळण्यास खूप मदत होईल.
‘फ्लू’मुळे न्यूमोनिया आणि ब्राँकायटिस होण्याची शक्यता
Flu likely to cause pneumonia and bronchitis
‘फ्लू’मुळे न्यूमोनिया आणि ब्राँकायटिस होण्याची शक्यता असते. डॉक्टरांच्या मते ‘इन्फ्लूएन्झा’ हा एक श्वसनामुळे होणारा विषाणू संसर्ग आहे, त्यामुळे याची लक्षणे कोरोना संसर्गाशी मिळती-जुळती आहेत. डॉक्टरांनी सांगितले की, दोन्हींची सामान्य लक्षणे सर्दी, खोकला, ताप आणि अंगदूखी आहे. पीडियाट्रिक्स ऍण्ड नियोनॅटोलॉजी चे डॉ. सुरेश बिराजदार यांच्या मते फ्लूची लस सहा महिने आणि त्याहून अधिक वयाच्या मुलांना देण्यात यावी. फ्लूमुळे न्यूमोनिया आणि ब्राँकायटिस होण्याची शक्यता असते, कारण न्यूमोनिया फुफ्फुसाचा संसर्ग असतो आणि ब्राँकायटिसमुळे फुफ्फुसाच्या नलिकांमध्ये संसर्ग पसरण्याचा धोका कायम असतो. यामुळे रूग्णांना श्वास घेण्यास त्रास होतो.
Pediatricians and the Corona Task Force have appealed to Chief Minister Uddhav Thackeray to get the children vaccinated before the monsoon.
तिसऱ्या लाटेवर मात करण्यासाठी विशेषतः सक्रिय उपाययोजना करण्याची आवश्यकता
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी तीन टप्प्यांचे धोरण अवलंबण्याची आवश्यकता