चीनच्या आणखी एका लसीला ‘सिनोवॅक’ डब्ल्यूएचओची मंजुरी!

जिनेवा : जागतिक आरोग्य संस्थेने (डब्ल्यूएचओ) मंगळवारी असे सांगितले की चीनच्या दुसऱ्या कोव्हिड-१९ लसीला ‘सिनोवॅक’ आपत्कालीन वापराच्या यादीत सामावेश करण्यासाठी मान्यता दिली आहे.

संयुक्त राष्ट्राच्या आरोग्य संस्थेने एका निवेदनात म्हटले आहे की, डब्ल्यूएचओ ने मंगळवारी आपत्कालीन वापरासाठी ‘सिनोवॅक-कोरोनावॅक कोव्हिड-१९’ लसीला मान्यता दिली आहे. देशांना, खरेदी संस्थांना आणि समुदायाला असे आश्वासन दिले आहे की ही लस सुरक्षा, कार्यक्षमता आणि तयार करण्याच्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय मानदंडांची पूर्तता करते. ही लस बिजिंगमधील औषध कंपनी सिनोवॅकद्वारे बनविण्यात आली आहे.
डब्ल्यूएचओचे सहाय्यक महासंचालक डॉ. मारियानजेला सिमाओ यांनी सांगितले की, जगाला अनेक कोरोना लसींची नितांत आवश्यकता आहे. आम्ही उत्पादकांना कोवॅक्स कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी, त्यांचे ज्ञान आणि माहिती सामायिक करण्यासाठी आणि साथीच्या आजारांवर नियंत्रण आणण्यासाठी योगदान देण्यास विनंती करतो. डब्ल्यूएचओ ने ७ मे रोजी आपत्कालीन वापरासाठी चीनच्या सिनोफार्म कोव्हिड-१९ च्या लसीला सशर्त मान्यता दिली होती.

भारतात प्रथमच मिळालेल्या कोरोना विषाणूच्या ‘बी.1.617.2’ व्हेरिएंटला नवीन नाव देण्य़ात आले आहे. जागतिक आरोग्य संस्थेने सांगितले की, ‘बी.1.617.2 ला ‘डेल्टा’ या नावाने ओळखले जाईल, तर येथे सापडलेल्या आणखी एका व्हेरिएंटला कप्पा असे नाव देण्यात आले आहे. कोरोनाच्या या प्रकारांची ओळख सर्वात प्रथम ऑक्टोंबर २०२० मध्ये भारतात झाली होती. डब्ल्यूएचओने ग्रीक अल्फाबेट्स च्या आधारे जगातील इतर देशांत मिळालेल्या कोरोनाच्या प्रकारांना देखील नाव दिले आहे. हा निर्णय तेव्हा घेण्यात आला होता जेव्हा कोरोनाच्या वेगवेगळ्या प्रकारांना (व्हेरिएंटला) देशांच्या नावांशी जोडण्याबाबत वाद निर्माण झाला होता. बी.1.617.2 ला इंडियन व्हेरिएंट असे म्हटल्यानंतर भारत सरकारने तीव्र आक्षेप नोंदविला होता.
WHO approves another Chinese vaccine ‘Sinovac’, this vaccine meets international standards


लस घेतल्यानंतर एका वर्षापर्यंत कोरोनावर मात करू शकतो : अहवाल –

कोरोनावर मात करणाऱ्यांना लसीनंतर बूस्टर डोसची आवश्यकता नाही….

Social Media