समीर वानखेडे यांना नार्कोटिक्स विभागाकडून क्लीन चीट

मुंबई : मुंबईच्या नार्कोटिक्स कंट्रोल विभागाचे(Narcotics Control Department) तत्कालीन विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांना केंद्रीय जात पडताळणी समितीने क्लीन चीट दिली आहे.

तत्कालीन मंत्री नवाब मलिक,(nawab Malik) मनोज संसारे आणि इतरांनी वानखेडे हे मागासवर्गीय नसून त्यांनी खोटा दाखला देत नोकरी मिळवल्याचा आरोप केला होता, त्याआधारे समितीने त्यांच्या दाखल्याची पडताळणी केली.

वानखेडे हे जन्माने मुस्लिम (Muslim)नसून ते हिंदू (Hindu)धर्मातील महार -३७ या मागासवर्गीय समाजाचे असल्याचे समितीने आपल्या अहवालात म्हटले आहे. वानखेडे यांनी त्यांच्या मुंबईतील कार्यकाळात असंख्य ठिकाणी धाडी टाकून मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ(drugs) जप्त केले होते, त्यातील एका प्रकरणात मलिक यांच्या जावयालाही अटक करण्यात आली होती.

 

Social Media