पंतप्रधान मोदींची घेतली मुख्यमंत्र्यांनी भेट, अर्धा तास वैयक्तिक भेटीने चर्चेला उधाण

दिल्ली : सुमारे वर्षभराच्या दीर्घ अंतराने आज सकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Chief Minister Uddhav Thackeray) यांनी शिष्टमंडळासमवेत पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांच्या नवी दिल्ली येथील निवासस्थानी भेट घेऊन राज्याचे केंद्राकडे प्रलंबित विषय मार्गी लावण्याची विनंती केली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar), सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण(Ashok Chavan) हे भेटीच्या वेळी उपस्थित होते.

मात्र शिष्टमंडळाच्या या भेटीनंतर ठाकरे यांनी मोदींशी अर्धा तास वैयक्तिक भेट घेऊन चर्चा केली , यात नेमके कोणते विषय होते हे गुलदस्त्यातच राहिल्याने या भेटीच्या चर्चेला उधाण आले आहे, आपण अशी भेट घेण्यात गैर काय असा सवाल ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना केला , राजकीय संबंध तुटले असले तरी वैयक्तिक संबंध कायम असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.या भेटीनंतर महाराष्ट्र सदन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खालील मुद्दे मांडले.

राज्याच्या प्रलंबित विषयांसाठी आम्ही पंतप्रधानांची भेट घेतली. या दरम्यान व्यवस्थित  चर्चा झाली. पंतप्रधानांनी सर्वच विषय गांभीर्याने ऐकले. केंद्राकडे प्रलंबित आहेत अशा प्रश्नांवर ते  सकारात्मक निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे. मी पंतप्रधानांना धन्यवाद देतो.
कुठेही राजकीय अभिनिवेश नव्हता. मी आणि माझे सहकारी समाधान आहोत. या प्रश्नांवर पंतप्रधान माहिती घेऊन  पुढील कार्यवाही निश्चितपणे केली जाईल अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

ज्या विषयांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदने दिली तसेच चर्चा झाली ते विषय असे आहेत :

  • एसईबीसी मराठा आरक्षण
  • इतर मागासवर्गीयांचे पंचायत राज संस्थेच्या निवडणुकीतील राजकीय आरक्षण
  • मागासवर्गीयांचे पदोन्नतीमधील आरक्षण
  • मेट्रो कार शेडसाठी कांजुरमार्ग येथील जागेची उपलब्धता : न्यायालयाबाहेर सर्वमान्य तोडगा काढणे
  • राज्यांना देय असलेली जीएसटी भरपाई
  • पिक विमा योजना : बीड मॉडेल
  • बल्क ड्रग पार्क : स्पर्धात्मक निविदेस मंजुरी
  • नैसर्गिक आपत्तीमधील मदतीसाठी एनडीआरएफचे कॉस्ट नॉर्म (निकष) बदलणे
  • १४ व्या वित्त आयोगातील थकीत निधी मिळण्याबाबत (शहरी स्थानिक )
  • १४ व्या वित्त आयोगातील थकीत निधी मिळण्याबाबत (पंचायत राज संस्था )
  • मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देणे
  • राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांच्या निवड करण्याबाबत.

अमरावती च्या खासदार नवनीत राणा यांची खासदारकी धोक्यात! –

अमरावती च्या खासदार नवनीत राणा यांचे जातप्रमाणपत्र उच्च न्यायालयाकडून अवैध घोषित

Social Media