६ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांचे कोंबिंग ऑपरेशन ; ३४६ आरोपींना अटक

मुंबई : ६ डिसेंबर भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५ व्या महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून शहरात ३०७ ठिकाणी कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात आले .१७५ ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली. यादरम्यान शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून शहरातील अभिलेखावरील १३३६ आरोपी तपासण्यात आले. यापैकी ३४६ आरोपींना अटक करण्यात आली. सोबतच रेकॉर्डवरील ६० फरारी तर अजामीनपात्र वॉरंटमधील ९५ आरोपीना अटक करण्यात आली.

अंमली पदार्थ खरेदी- विक्री करणा ऱ्या १९७ जणांवर एनडीपीएस ऍक्टनुसार कारवाई करण्यात आली. तसेच मुंबई शहराबाहेर तडीपार केलेले , परंतु शहरात विना परवाना राहणाऱ्या ५२ तडीपारांना अटक करण्यात आली. अवैध शस्त्र बाळगणाऱ्या ६२ जणांवर कारवाई करण्यात आली.

अवैध दारू विक्री आणि जुगाराच्या अड्ड्यावर ४७ ठिकाणी छापे टाकून ते उध्वस्त करण्यात आले . महाराष्ट्र ( मुंबई ) पोलीस कायदयाचे कलम १३०,१२२व १३५ अन्वये संशयितरित्या वावरणारे एकुण १८१ जणांवर कारवाई करण्यात आली आहे . त्याचप्रमाणे १६४ अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली.

यादरम्यान ११ हजार ४४७ दुचाकी व चारचाकी वाहनांची तपासणी करण्यात आली . मोटार वाहन कायद्यान्वये २६५० वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली . ड्रंक अँड ड्राइव्ह अंतर्गत ९ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाईचे अनुषंगाने १२९७, हॉटेल , लॉजेस , मुसाफिरखाने यांची तपासणी करण्यात आली . तर ७१८ मर्मस्थळे व संवेदनशिल ठिकाणे तपासण्यात आले.

शुक्रवारी ११ ते शनिवारी दुपारी २ वाजेपर्यंत राबविण्यात आलेल्या या ऑल आऊट ऑपरेशन दरम्यान अनेक सराईत गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली. मुंबई चे पोलीस आयुक्त हेमत नगराळे व पोलीस सह आयुक्त ( कायदा व सुव्यवस्था ) विश्वास नांगरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील ५ प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त , १३ परिमंडळीय पोलीस उप आयुक्त , ४१ विभागीय सहायक पोलीस आयुक्त , सर्व पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी , अंमलदार यांनी यात भाग घेतला होता.

Combing operation of Mumbai Police in the wake of December 6

Social Media