Commonwealth Games 2022: सुधीरनं पॅरा पॉवरलिफ्टिंगमध्ये जिंकलं सुवर्ण

CWG 2022: कॉमनवेल्थ गेम्स 2022 (Commonwealth Games 2022)पुरुषांच्या हेवीवेट पॅरा पॉवरलिफ्टिंगमध्ये भारताच्या सुधीरने त्याच्या दमदार कामगिरीच्या जोरावर देशासाठी सुवर्णपदक जिंकले आहे. सुधीरने पुरुषांच्या हेवीवेटमध्ये १३४.५ धावा केल्या. याशिवाय त्याने एक नवा विक्रमही केला आहे. राष्ट्रकुल स्पर्धेतील भारताचे हे सहावे सुवर्णपदक आहे. या स्पर्धेत भारताने आतापर्यंत एकूण वीस पदके जिंकली आहेत. राष्ट्रकुल 2022 च्या पदकतालिकेत भारत सातव्या स्थानावर आहे.

सुधीरने पुरुषांच्या हेवीवेट पॅरा पॉवरलिफ्टिंगमध्ये एकहाती कामगिरी केली. या सामन्यात सुधीर त्याच्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा खूप पुढे होता. त्याने पहिल्याच प्रयत्नात 208 किलो वजन उचलले. यानंतर त्याने दुसऱ्या प्रयत्नात 212 किलो वजन उचलले. सुधीरचे वजन 87.30 आहे. त्यामुळे त्याला १३४.५ गुण मिळाले. या आकड्यांसह त्याने नवा विक्रमही केला आहे.

भारतीय ऍथलेटिक्स मोहम्मद अनीस याहिया अंतिम फेरीत पदक जिंकू शकला नाही. तो 6 प्रयत्नांनंतर 7.97 च्या सर्वोत्तम प्रयत्नांसह पाचव्या स्थानावर राहिला. याहियानने पहिल्या तीन प्रयत्नांमध्ये 7.72 मीटरची सर्वोत्तम कामगिरी केली. मात्र, त्याचा पहिलाच प्रयत्न फाऊल ठरला. दुसऱ्या प्रयत्नात त्याने 7.65 मीटर उडी मारली. त्यानंतर तिसऱ्या प्रयत्नात 7.72 मीटर, चौथ्या प्रयत्नात 7.74 मीटर, पाचव्या प्रयत्नात 7.58 मीटर आणि सहाव्या प्रयत्नात 7.97 मीटर उडी मारली.

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत(Commonwealth Games 2022) भारतासाठी पदक जिंकणाऱ्या खेळाडूंची यादी-

सुवर्णपदक – 6 (मीराबाई चानू, जेरेमी लालरिनुंगा, अंचिता शेवली, महिला लॉन बॉल संघ, टेबल टेनिस पुरुष संघ, सुधीर)

रजत पदक– 7 (संकेत सरगर, बिंद्यारानी देवी, सुशीला देवी, विकास ठाकुर, भारतीय बैडमिंटन टीम, तूलिका मान, मुरली श्रीशंकर।)

कांस्य पदक– 7 (गुरुराजा पुजारी, विजय कुमार यादव, हरजिंदर कौर, लवप्रीत सिंह, सौरव घोषाल, गुरजीत सिंह, तेजस्विन शंकर।)

Social Media