काश्मीर फाईल्सचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींविरोधात वर्सोवा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार

मुंबई : ‘द काश्मिर फाईल्स’ सिनेमाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी भोपाळी नागरिकांना समलिंगी संबोधल्याबद्दल मुंबईच्या वर्सोवा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे एका नव्या वादाला तोंड फुटले आहे.

मुंबईत मनोरंजन बातम्यांचे कव्हरेज करणारा पत्रकार रोहित पांडे यांनी ही तक्रार दाखल केली आहे. विवेक अग्निहोत्री यांनी एका कार्यक्रमाच्या निमित्तानं हे वादग्रस्त विधान केलं होतं. त्यांनी भोपाळी हे समलैंगिक असल्याचे म्हटले होते. त्यावरुन त्यांना नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात ट्रोलही केले. त्यांना वेगवेगळ्या कमेंटस् देऊन त्यांच्यावर टीकाही करण्यात आली. अग्निहोत्री यांचे म्हणणे होते की, ”भोपाळी या शब्दाचा अर्थ समलिंगी असा आहे. आपल्यापैकी अनेकांना त्याचा अर्थ माहिती नाही. त्यामुळे मी जे काही बोलले आहे त्याचा चूकीचा अर्थ काढला जात आहे”.

या तक्रारीत तक्रारदार पत्रकार

रोहित पांडेचे वकील अली काशिफ खान देशमुख यांनी काही मुद्दे उपस्थित केले आहे. माझ्या अशिलाला सिनेमाविषयी प्रेम आहे. त्यात दाखवलेल्या सत्य घटनेला त्यानं आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचं कामही केलेलं आहे. पण तो स्वतः भोपाळचा रहिवासी आहे. त्याला आपल्या शहराचा,तिथल्या लोकांचा अभिमान आहे. त्यामुळे विवेक अग्निहोत्री यांनी तिथल्या लोकांना समलिंगी संबोधल्यानं आपल्या भावना दुखावल्या आहेत. त्याविरोधात ही तक्रार वर्सोवा पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

‘The Kashmir Files’ director Vivek Agnihotri has filed a complaint at Mumbai’s Versova police station for calling Bhopalis gay. This has led to a new controversy.


बच्चन पांडेच्या ‘फ्लॉप’बद्दल अक्षय म्हणाला – काश्मीर फाइल्सने चित्रपट बुडवला

Dr. Nagraj Manjule : दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना डॉक्टरेट पदवी प्रदान !

Social Media