कन्फर्म तिकीट (Confirmed-train-ticket)मिळण्याआधीच तिकीट बुकींग फूल्ल झालेली असते. आणि आपली तिकीट वेटींगवर येते. अशावेळी आपली डोकेदुखी खूप वाढते. अशावेळी काय करायचं हे आपल्याला कळत नाही.
● असे असताना आपल्यासमोर तत्काल बुकिंगचा पर्यायही उपलब्ध असतो. पण तत्काल बुकिंग करणं इतकं सोपं नाही. पण एक ट्रीक वापरुन तुम्ही तुमचे कन्फर्म तिकीट मिळवू शकता.
● रेल्वेकडून(railway) करंट तिकीट बुकिंग सुरू केले आहे. ट्रेनमध्ये एकही सीट रिकामी राहू नये आणि प्रत्येकाला कन्फर्म तिकीट मिळावे, यासाठी रेल्वेने हा निर्णय घेतलाय. यामध्ये तुम्ही ट्रेन सुटण्याच्या 4 तास आधी ते पाच मिनिटांपूर्वीदेखील तिकीट बुक करू शकता.
● करंट तिकिटाची एक चांगली गोष्ट म्हणजे तत्काल किंवा प्रीमियम तत्कालच्या विपरीत प्रवाशांना कोणतेही अतिरिक्त शुल्क भरावे लागत नाही .
● तत्काल तिकिटाच्या तुलनेत करंट तिकिटात कन्फर्म तिकीट बुक करणे सोपे आहे. उपलब्धतेनुसार, तुम्हाला यामध्ये कन्फर्म तिकिटे सहज मिळू शकते.
● तुम्ही आयआरसीटीसीच्या (IRCTC)अधिकृत वेबसाइटवरून किंवा रेल्वे तिकीट आरक्षण बुकिंग काउंटरवरून करंट तिकिट सहजपणे बुक करू शकता.