कंत्राटी शिक्षकांचे जिल्हा परिषदेवर हल्लाबोल आंदोलन

रत्नागिरी : शासनाने ५ सप्टेंबर रोजी कंत्राटी शिक्षक(Contract-teacher) भरती संदर्भात काढलेला अद्यादेश कायम ठेवून त्याची त्वरीत अंमलबजावणी करावी, यासाठी बुधवारी जिल्ह्यातील डीएड., बीएड., बेरोजगारधारकांनी जिल्हा परिषदेवर हल्लाबोल करत एक दिवसाचे धरणे आंदोलन केले.
शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेवर 20 किंवा 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत सेवानिवृत्त शिक्षक किंवा डी.एड., बी.एड. झालेल्या बरोजगारांना कंत्राटी शिक्षक म्हणून नेमणूका देण्याचा निर्णय 5 सप्टेंबर रोजी घेतला. त्यानुसार अध्यादेशही काढला गेला. कंत्राटी तत्वावर नेमणूक मिळाल्यानंतर संबंधित शिक्षकाला शासनाकडून महिन्याला 15 हजार रुपये मानधन मिळणार आहे. वर्षाला 12 रजा असणार असतील. मात्र प्रशासकीय अधिकार नसतील. इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवावेत, असे शासनाच्या आदेशात स्पष्ट म्हटले आहे. जिल्हास्तरीय समितीकडून याची पडताळणी करुन या उमेदवारांना त्वरित नियुक्ती द्याव्यात, असेही म्हटले आहे.
या निर्णयाची अंमलबजावणी त्वरीत करावी. या मागणीसाठी जिल्ह्यातील डी.एड., बी.एड. बेरोजगार(Unemployed) एकवटले आहे. तत्पूर्वी राज्यातील शिक्षकांनी या निर्णयाला विरोध करत हा निर्णय रद्द करावा, या मागणीसाठी बुधवारी राज्यभर आंदोलन करत शाळाबंद ठेवल्या होत्या. मात्र बी.एड., डी.एड. बेरोजगारधारकांनीसुद्धा या विरोधात आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार बुधवारी सकाळी 11 वा. जि.प. च्या आवारात शेकडो बेरोजगार एकत्र येत एक दिवसाचे धरणे आंदोलन केले. यावेळी प्रचंड घोषणाबाजी झाली.
याबाबत प्रशासनाला निवेदन देण्यात आले. यावेळी शिक्षणाधिकारी बी.एम. कासार व उपशिक्षणाधिकारी संदेश कडव यांच्यासह संघटनेचे सुदर्शन मोहिते, अजिंक्य पावसकर, गिरीश जाधव, संजय कुळ्ये, सुनिता महाडिक, सुप्रिया तोडणकर, प्रज्ञा कदम, मृदूला देसाई, रुपाली वाघे आदी उपस्थित होते.
Social Media