कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे विमान क्षेत्राचे मोठ्या प्रमाणात नुकसान; एअरएशियाची ९० टक्के विमाने ठप्प!

नवी दिल्ली : कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे एअरएशिया संघाची सुमारे २००हून अधिक विमाने ठप्प झाली आहे. कोरोना संसर्गामुळे विमान कंपनीला आशिया खंडातील व्यापारासंदर्भात अनेक अडचणी येत आहेत. मलेशिया संघाच्या एका कार्यकारी अधिकाऱ्याने बुधवारी याबाबत माहिती दिली.

कोरोनामुळे विमान क्षेत्राचे मोठ्या प्रमाणात नुकसान

Corona causes massive damage to airspace

१०५ विमानांसह सर्वात मोठी बाजारपेठ असलेला मलेशिया सध्या लॉकडाऊन मध्ये आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी जावेद अन्वर मलिक यांनी बुधवारी सीएपीए सेंटर फॉर एव्हिएशन इव्हेंटमध्ये सांगितले की, एअरएशिया मलेशियाला अपेक्षा आहे की ऑगस्टपासून पुन्हा मागणी सुरू होऊ शकते, त्यामुळे ते ऑक्टोबरपर्यंत सर्व 17 देशांतर्गत विमानतळांवर सेवा पुनर्संचयित करू शकतील. त्यांनी सांगितले की, २०२२ च्या तिसऱ्या तिमाहीपर्यंत संपूर्ण आशिया खंडात याची मागणी पूर्व-कोव्हिड पातळीवर पोहोचण्याची शक्यता कमी आहे.

एअरएशिया समूहाला मागील महिन्यात सलग सातव्या तिमाहीत तोटा सहन करावा लागला होता, विमान कंपनीने सांगितले की, ते सातत्याने अधिक रोकड गोळा करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. 31 मार्च रोजी संपलेल्या तिमाहीत प्रवाशांची एकूण संख्या ९,७६,९६८ होती, जी एका वर्षा पूर्वीच्या तुलनेत 90 टक्क्यांनी कमी आहे.
Heavy loss to the airline sector due to increase in Corona cases, 90 percent of AirAsia aircraft grounded.


बँक ऑफ इंडियावर ४ कोटी, तर पंजाब नॅशनल बँकेवर दोन कोटी रूपयांचा दंड –

आरबीआयने पंजाब आणि बँक ऑफ इंडियावर सहा कोटी रुपयांचा दंड ठोठावला….

Social Media