कोरोना संकटामुळे कर्ज वितरणावर मंदी, तर ठेवींमध्ये तेजी : आरबीआय

नवी दिल्ली : कोरोना संकटामुळे बॅँकिग क्रेडिट म्हणजेच बॅँकेद्वारे वितरणाची गती मंदावली आहे. परंतु भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) च्या आकडेवारीनुसार कोरोना संसर्गाच्या सुरूवातीपासूनच देशात आर्थिक क्रिया कमी होण्याचा परिणाम बॅंकांद्वारे कर्ज वितरणाच्या गतीवर दिसून येत आहे.

आकडेवारीनुसार असेही दिसून येते की, एकिकडे कोरोनामुळे वाढती बेरोजगारी आणि लोकांच्या उत्पन्नावर परिणाम होण्याची चर्चा होत आहे. दुसरीकडे बँकांमध्ये ठेवी वाढत आहेत. कोव्हिड काळात म्हणजेच मार्च २०२० नंतर जसजसा देशात कोव्हिड-१९ संसर्गाचा प्रसार वाढत आहे तसतशा बँकांच्या ठेवीही वाढल्या आहेत आणि कर्जाची गती मंदावली आहे.

भारताच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासाचा दर मंदावला

India’s economic and industrial growth slows down

मार्च २०१९ मध्ये बँकींग क्षेत्रातील कर्जाचा विकास दर १३.१ टक्के होता, जो मार्च २०२० मध्ये ६.४ टक्के आणि मार्च २०२१ मध्ये ५.६ टक्के आहे. बँकिंग कर्जाची गती कमी होण्याचा थेट संबंध आर्थिक क्रिया मंदीशी जोडला जातो. हे देखील लक्षात घेण्यासारखे आहे की, मार्च २०१९ नंतर भारताच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासाचा दर मंदावला आहे. बॅंकांची कर्ज वितरण गती अशा वेळी मंदावली आहे, जेव्हा सरकार आणि आरबीआय व्याज दरांना गेल्या एक दशकात किमान पातळीवर आणण्यात सक्षम झाली आहे.

म्हणजेच दर स्वस्त असूनही लोक कर्ज घेत नाहीत. दुसरीकडे, कोरोना कालावधीत बँकांमध्ये ठेवीची गती वाढत आहे. मार्च २०२० मध्ये ठेवीची रक्कम ९.५ टक्के होती, जी सप्टेंबर २०२० मध्ये वाढून ११ टक्के झाली. शुक्रवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार मार्च २०२० मध्ये हा वेग १२.३ टक्के होता. बँकांमधील ठेवींमध्ये जून २०१७ नंतरची ही सर्वात मोठी वाढ आहे. यामुळे असे दिसून येत की, कोरोना संकटाच्या वेळी लोकांमध्ये कठीण काळात पैसे वाचविण्याची प्रवृत्ती वाढली आहे.
Data from the Reserve Bank of India (RBI) show that even before the onset of the Corona epidemic, the impact of reduced economic activity in the country had begun to appear on the pace of loan disbursement by banks.


नोटाबंदीनंतर ५०० रूपयांच्या नोटा सर्वाधिक चलनात –

२०२१ मध्ये २००० चलनी नोटांचा पुरवठा कमी : आरबीआय

Social Media